प्रथम मैत्री, नंतर युवतीने दिला त्रास; तरुणाने सारी हकीकत लिहून उचलले टोकाचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 17:45 IST2020-08-05T17:43:57+5:302020-08-05T17:45:46+5:30
युवतीने नव्या मित्रासह खूप त्रास दिल्याने गळफास लावून आत्महत्या केली.

प्रथम मैत्री, नंतर युवतीने दिला त्रास; तरुणाने सारी हकीकत लिहून उचलले टोकाचे पाऊल
तामसा (जि. नांदेड) : प्रथम एका युवकाशी मैत्री केल्यानंतर दुसऱ्याच युवकाशी सलगी करुन प्रेयसीने पतीसह प्रियकराचा छळ केला. या छळास कंटाळून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तामसा येथे घडली. ४ आॅगस्ट रोजी याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तामशातील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहणारा युवक बजरंग ऊर्फ रोहित मंचक सूर्यवंशी (वय २५) हा एका खाजगी कंपनीत कामाला होता. यादरम्यान कंपनीतील एका युवतीसोबत त्याचे प्रेम जुळले. कालांतराने सदरील युवतीचे अन्य एकासोबत प्रेम जुळल्याने बजरंग अस्वस्थ झाला. यातूनच तो वैफल्यग्रस्त बनला. युवतीने नव्या मित्रासह खूप त्रास दिल्याने बजरंगने गळफास लावून आत्महत्या केली.
प्रेमसंबंधांच्या घटना- घडामोडी लिहून ठेवल्या
आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमसंबंधाच्या सगळ्या घटना-घडामोडी मयत बजरंगने विस्तृत स्वरूपात लिहून ठेवल्या होत्या. याच नोंदीच्या आधारे दोन्ही आरोपींनी मुलास मानसिक त्रास दिला, अशी तक्रार मंचक सूर्यवंशी यांनी तामसा पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी युवती (रा. जाकापूर ता. भोकर) व आरोपी मुलगा (रा.किरमगाव ता. हिमायतनगर) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन गुन्हा नोंदविला.