शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

नांदेडच्या ‘गोल्डमॅन’वर गोळीबार; तपास ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 6:46 PM

कार्यालयासमोरच दुचाकीवर आलेल्या दोघांनी केला गोळीबार

ठळक मुद्देदोन दिवसानंतरही तपासात प्रगती नाही

नांदेड : काँग्रेस कार्यकर्ते तथा मराठवाडा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष गोविंद कोकुलवार यांच्यावर शनिवारी सायंकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासाला अद्याप गती आली नसून या घटनेचे धागेदोरे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखले जाणारे गोविंद कोकुलवार हे शनिवारी सायंकाळी आपल्या कार्यालयात आले होते. गाडीतून खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. यात कोकुलवार हे गंभीर जखमी झाले. कोकुलवार यांना प्रारंभी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे तातडीने हलविण्यात आले. कोकुलवार यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली. त्याचवेळी काही पथके शहराबाहेरही रवाना करण्यात आली आहेत. मात्र, या तपासात म्हणावी तशी प्रगती झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.कोकुलवार यांचा फायनान्सचा  व्यवसाय असून अनेक आर्थिक बाबींशी ते निगडित आहेत. याच सर्व प्रकारातून घटना घडली काय? या दृष्टीनेही पोलीस तपास करीत आहेत तर दुसरीकडे खंडणीचा प्रकार आहे काय? याबाबतही सूत्रे हलविली जात आहेत. पोलिसांना आतापर्यंत कोकुलवार यांनी एकही तक्रार अथवा धमकीबाबत माहिती दिली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNandedनांदेड