नांदेडमध्ये आइस्क्रीम फॅक्ट्रीला आग; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 14:52 IST2020-08-27T14:50:13+5:302020-08-27T14:52:21+5:30
मनपा अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात

नांदेडमध्ये आइस्क्रीम फॅक्ट्रीला आग; लाखोंचे नुकसान
नांदेड : शहरातील शिवाजीनगर ओद्यौगिक वसाहतीत असलेल्या एका आइस्क्रीम फॅक्ट्रीला आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. अग्निशमन विभागाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.
शिवाजीनगर ओद्यौगिक वसाहतीत न्यू मेट्रो इंटरप्राइजेस ही आईस्क्रीम फ़ैक्ट्री आहे. गुरुवारी सकाळी अचानक या फॅक्ट्रीला आग लागली. यावेळी फ़ैक्ट्रीत असलेल्या फ्रीजरमधील कम्प्रेशरचे स्फोट होऊ लागले. या फॅक्ट्रीच्या बाजूने नमकीन, चुरमुरेचे गोदाम आहेत. या ठिकाणी आग पोहोचण्याची भीती होती. मनपा अग्निशमन अधिकारी रईस पाशा व कर्मचाऱ्यांनी तीन अग्निशमन बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण मात्र अद्याप पुढे आले नाही.