बोगस सोयाबीन प्रकरणी मध्यप्रदेशाच्या आणखी एका कंपनीवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 17:12 IST2020-07-13T17:12:01+5:302020-07-13T17:12:41+5:30
अर्धापूर पोलीस ठाण्यात प्रगती कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

बोगस सोयाबीन प्रकरणी मध्यप्रदेशाच्या आणखी एका कंपनीवर गुन्हा
नांदेड : सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात शनिवारी मध्यप्रदेशच्या दोन कंपन्यांच्या विरोधात नायगाव आणि मुदखेड येथे गुन्हे नोंदविण्यात आले होते़ त्यानंतर रविवारी प्रगती अॅग्रो सर्व्हिसेस बुºहाणपूर या कंपनी विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ अर्धापूर तालुक्यातील नऊ गावांतील शेतकऱ्यांनी या कंपनीचे सोयाबीन पेरले होते़
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची उगवणच झाली नाही़ त्यामुळे अशा कंपनीच्या विरोधात आता गुन्हे नोंदविण्यास सुरुवात झाली आहे़ यातील बहुतांश कंपन्या या मध्यप्रदेशातीलच आहेत़ अर्धापूर तालुक्यातील नऊ गावांतील शेतकऱ्यांनी मध्यप्रदेशातील प्रगती अॅग्रो सर्व्हिसेस या कंपनीचे सोयाबीन पेरले होते़ परंतु या बियाणांची उगवणच झाली नाही़ याबाबत शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे तक्रारी केल्या होत्या़ त्यानंतर कृषी अधिकारी गार्गी धोंडीराज स्वामी यांच्या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीस ठाण्यात प्रगती कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़