शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कंधार शहरात लिंबोटीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 00:36 IST

शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़

ठळक मुद्देअडथळ्याच्या शर्यतीवर मात : शहरवासियांना मिळाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ आणि ५ मे रोजी शहरात पाणी दाखल झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला़शहराला सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत २५ कोटी ६७ लाख ७२ हजारांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ साडेतीन वर्षे संपत आले; पण योजना कार्यान्वित होवू शकली नाही़ एक्स्प्रेस फिडरचे काम प्रगतीपथावर असल्याचे सातत्याने सांगितले जाते़ ते पूर्ण कधी होणार? हा खरा प्रश्न आहे़ लिंबोटी येथील पाणीपुरवठा योजनेचे पूर्ण काम होऊनच शहराची खरी तहान भागणार आहे़ अन्यथा तात्पुरती व पर्यायी व्यवस्था कधी कोलमडेल, याचा भरवसा नाही़शहरात जवळपास १० दिवस पाण्याचा ठणठणाट झाल्यानंतर ऩप़ने लिंबोटी येथील पाणी आणण्याची कसरत सुरू केली़ विद्युत पुरवठा नसल्याने जनरेटरचा वापर केला़ आणि २० एच़पी़च्या मोटारीने पाणी आणण्याचा प्रयत्न केला़ जलवाहिनीत पाणी येत असताना मध्येच जलवाहिनी फुटली़ त्याची दुरुस्ती करण्यात आली़ पुन्हा जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला़ त्यामुळे प्रयत्नाला खीळ बसली़ त्यानंतर मोठ्या क्षमतेच्या जनरेटरचा वापर करून प्रयत्न सुरू झाले़ आणखी अडथळा आला़ त्यावर मात करून अखेर ५ मे रोजी रात्री शहरात पाणी दाखल झाले़ आणि ६ मे रोजी काही भागात पाणीपुरवठा करण्यात आला़ ‘लोकमत’ने शहर पाणी पुरवठ्याचा प्रश्न लावून धरला होता़ नगराध्यक्षा शोभा नळगे, मुख्याधिकारी सवाखंडे, पाणीपुरवठा विभागाचे लुंगारे, एजाज, नगरसेवक शहाजी नळगे आदींनी मोठी अडथळ्यांची शर्यत पार करीत पाणी आणले़ परंतु, ९० एच़पी़ च्या मोटारीने पाणी शहरात आले तरच पाणी संकट पूर्णत: टळणार आहे़ अन्यथा नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़दरम्यान, पाणी जपून वापरण्याची गरज आहे़ त्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन केले आहे़शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी ऩप़ने कोणतीही कसर ठेवली नाही़ अनेक तांत्रिक अडचणी आल्या़ त्यावर मात करत पाणी शहरात आणले़ आता ९ एच़पी़च्या मोटारीने जनरेटरचा वापर करत पाणी दोन दिवसांत शहरात आणले जाईल़ विद्युतची कामे करण्यावर भर राहील व पाणीसमस्या दूर होईल -शोभा अरविंद नळगे, नगराध्यक्षा, कंधाऱ

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक