दोन गटांत हाणामारी, ३८ जणांना अटक, नायगाव तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:32 IST2021-03-13T04:32:25+5:302021-03-13T04:32:25+5:30
कहाळा खु. येथील प्रभाकर नामदेव मेघाळ व नामदेव हेंडगे आपसात भांडन करीत होते. हे भांडण नामदेव यांचा मुलगा सोडविण्यासाठी ...

दोन गटांत हाणामारी, ३८ जणांना अटक, नायगाव तालुक्यातील घटना
कहाळा खु. येथील प्रभाकर नामदेव मेघाळ व नामदेव हेंडगे आपसात भांडन करीत होते. हे भांडण नामदेव यांचा मुलगा सोडविण्यासाठी मध्ये पडला असता प्रभाकर यांनी त्यास मारहाण केली. ही बाब गावात पसरून दोन्ही गट आमनेसामने आले. घटनेची माहिती मिळताच कुंटूरचे सपोनि करीमखा पठाण, बीट प्रमुख भार्गव सुवर्णकार, एन.एम. पोळे यांनी घटनास्थळी भेट देऊन भांडण सोडविले. या घटनेला ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद कारणीभूत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी प्रथम तक्रार काशीबाई मेघाळ यांनी दिल्यावरून १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, तर दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून १९ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. सगळ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सपोनि करीमखा पठाण यांनी दिली. तपास जमादार एन.एम. पोले करीत आहेत.