नांदेड : शहरातील शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय बँक खात्यातून साडेचौदा कोटी रुपये आरटीजीएसद्वारे लांबविण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी विदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यात आता २० रुपये वळते करणारा १५ वा आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. मुंबईच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समधून त्याला ताब्यात घेण्यात आले. आयडीबीआय बँकेचे खाते हॅक करून त्यातून शंकर नागरी बँकेचे १४ कोटी ४६ लाख रुपये पळविण्यात आले होते. याबाबत वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या प्रकरणात सर्वाधिक गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहेत. पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड हे प्रकरणाचा तपास करीत आहेत. रविवारी या गुन्ह्यातील पंधरावा आरोपी सपोनि. व्ही.डी. जाधव, लोखंडे, बालाजी केंद्रे यांनी पकडला. अभिजित अंदानी शेट्टी असे त्याचे नाव असून त्याच्याकडे कर्नाटक बँकेचे धनादेश, पुस्तक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बनावट क्रेडिट कार्ड यासह इतर अनेक कागदपत्रे सापडली. पोलिसांची वेगवेगळी पथके या प्रकरणाच्या तपासात आहेत.
हॅकिंग प्रकरणात पंधरावा आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST