शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलकांचीच धास्ती! एकतर्फी वाटणारी निवडणूक आता होत आहे चुरशीची

By श्रीनिवास भोसले | Updated: April 20, 2024 05:43 IST

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एन्ट्रीने भाजपला एकतर्फी वाटू लागलेली नांदेड मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत आहे.

श्रीनिवास भोसले, लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या एन्ट्रीने भाजपला एकतर्फी वाटू लागलेली नांदेड मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होत आहे. गेल्या निवडणुकीत वंचित फॅक्टर निर्णायक ठरला होता. परंतु, यंदा मराठा आंदोलकांची सर्वाधिक धास्ती आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ‘ना महाविकास आघाडी ना महायुती’, अशी भूमिका घेतली. त्यामुळे मराठा मतदार कुणाच्या पारड्यात मत टाकतात, यावर निकाल अवलंबून असेल.  

भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी २०१९ मध्ये ज्यांना पराभूत केले ते काँग्रेसचे बलाढ्य नेते अशोक चव्हाण यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला असून येथील लढाई त्यांच्या राजकीय करियरसाठी कलाटणी देणारी आहे. तर काँग्रेसने माजी आमदार वसंत चव्हाण यांना रिंगणात उतरवत नांदेडची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मागील निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावरील वंचितने यावेळी लिंगायत चेहरा म्हणून अविनाश भोसीकर यांना उमेदवारी दिली. परंतु, त्यामुळे पक्षांतर्गत इच्छुक नाराज आहेत. 

विद्यमान आमदारांची सावध भूमिका महायुतीच्या प्रतापराव चिखलीकर यांच्या बाजूने भाजपचे आमदार राम पाटील, डाॅ. तुषार राठोड, राजेश पवार व शिंदेसेनेचे बालाजी कल्याणकर आहेत. तर काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांच्या बाजूने काँग्रेसचे आमदार मोहनराव हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर आहेत. काही आमदारांनी प्रचारात झोकून दिले आहे. मात्र, भाजप व काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराने सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. विधानसभा डोळ्यासमोर ठेवून घटक पक्षातील पदाधिकारी सेटलमेंटचे राजकारण करू पाहत आहेत. 

एकूण मतदार     १८,४३,२४४ पुरुष ९,५०,९७६महिला ८,९२,१२९  शिवसेना अन् राष्ट्रवादीचे तुकडे कुणाच्या पथ्यावर- मागील पाच वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथीचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर निश्चितच होणार आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेचे झालेले दोन तुकडे कुणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. - अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, भाजपचे काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हातचा राखून प्रचार करत आहे. त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

निवडणुकीतील कळीचे मुद्दे - नांदेड येथून मुंबई, पुण्यासाठी नियमित विमानसेवा सुरू करणे. जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योेग नसल्याने वाढती बेरोजगारी. - मराठा आरक्षण, सगेसोयरे आदी मागण्यांवरून राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांकडून गावागावात केला जाणारा विरोध. - जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न, शेतीमालाला हमीभाव, वाढती महागाई, शिक्षणाचे खासगीकरण, महिलांचे प्रश्न. 

२०१९ मध्ये काय घडले?प्रतापराव चिखलीकर     भाजप (विजयी)    ४,८६,८०६अशोकराव चव्हाण           काँग्रेस    ४,४६,६५८ यशपाल भिंगे    वंचित बहुजन आघाडी    १,६६,१९६नोटा    -    ६,११४

वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते          २०१४    अशोक चव्हाण    काँग्रेस    ४,९३,०७५     २००९    भास्करराव पाटील    काँग्रेस    ३,४६,४००     २००४    डी. बी. पाटील    भाजप    ३,६१,२८२     १९९९    भास्करराव पाटील    काँग्रेस    ३,२७,२९३     १९९८    भास्करराव पाटील    काँग्रेस    ३,३७,७४४ 

टॅग्स :Nandedनांदेडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षण