पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:29 IST2020-12-05T04:29:17+5:302020-12-05T04:29:17+5:30

नांदेड : शहरातील नवी आबादी भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ...

Fatal attack on father and son | पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला

पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला

नांदेड : शहरातील नवी आबादी भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, तर घटनेत पिता आणि पुत्र दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

नवी आबादी येथील ॲड. ईश्वर जोंधळे घरासमोर थांबलेले असताना मोहम्मद इरफान मोहम्मद रफिक व इतर दहा जणांनी जुन्या वादावरून जोंधळे यांचा मुलगा आणि पुतण्या यांना घेरून मारहाण सुरू केली होती. ही बाब जोंधळे यांच्या लक्षात आल्यानंतर भांडण सोडविण्यासाठी ते मधे पडले. यावेळी आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. फुटलेल्या काचेच्या बाटलीने भोसकून खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जोंधळे पिता-पुत्र जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Fatal attack on father and son