शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भोकर-नांदेड महामार्गावर रिक्षा- टेम्पोचा भीषण अपघात; ४ जणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:54 IST

सिताखांडी घाटात भरधाव टेम्पोची रिक्षास धडक; भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी

- राजेश वाघमारे

भोकर : तालुक्यातील नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात भरधाव टेम्पोने सीटर रिक्षास जोरदार धडक दिल्याची घटना आज दुपारी चार वाजता घडली. यात रिक्षातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार प्रवासी गंभीर जखमी आहेत.

येथील नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव टेम्पोने ( क्र. एह एच १९ एस ४९९३) समोरुन नांदेड ते भोकर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षास (क्र. एम एच २६ बी एक्स ३८१५) जोरदार धडक दिली. दरम्यान, अपघाताचे भीषण दृश्य पाहून नागरिक, वाहनधारकांनी मदतीसाठी धाव घेतली. रिक्षाची समोरची पूर्णपणे दबली गेल्याने पत्रा कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. रिक्षातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमींना अधिक उपचारासाठी नांदेडकडे रवाना करण्यात आले आहे. 

मृतांची नावे: भुलाबाई गणेश जाधव (वय ४५ रा. पोटातांडा, ता. हिमायतनगर) , संदिप किशनराव किसवे (वय २६, रा. हळदा ता. भोकर), संजय ईरबा कदम ( वय ४८ रा. हिमायतनगर), बापुराव रामसिंग राठोड (वय ५७ रा. पाकीतांडा, ता. भोकर) आदी चार प्रवासी ठार झाले आहेत. 

गंभीर जखमींची नावे: परमेश्वर केशव महाजन (रा. इरसनी) कैलास गणपत गडमवार (रा. सिरंजणी ता. हिमायतनगर), मंगेश गोविंदराव डुकरे (वय २२  रा. लहान ता. अर्धापूर) आणि देवीदास गणेश जाधव ( रा. पोटातांडा) यांचा समावेश आहे.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेडDeathमृत्यू