शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

हदगावात शेतकरी आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:53 IST

सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली.

ठळक मुद्देपीक विमा, राष्ट्रीय महामार्ग जमिनीच्या मोबदल्याचा परिणाम: २०१७ मध्ये १३ तर २०१८ च्या चार महिन्यांत ५ आत्महत्या

सुनील चौरेलोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : सन २०१३ ते एप्रिल २०१८ पर्यंत हदगाव तालुक्यात ८६ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या. त्यापैकी ६० आत्महत्येची प्रकरणे पात्र ठरली.तर २४ शेतकरी आत्महत्या प्रकरणे समितीने अपात्र ठरविली आहेत. सन २०१७-१८ या दोन वर्षांत मात्र ही संख्या घटली. हे एक चांगले लक्षण असून पीक विमा व राष्ट्रीय महामार्गाने जमिनीचा मोबदला हे एक कारण त्यापाठीमागे असल्याची चर्चा आहे.पूर्वी शेतकरी खाजगी सावकारांकडून पेरणी, लग्न, शिक्षणासाठी कर्ज घेत. पिकाला उतारा न आल्याने सावकाराचे कर्ज फिटत नसे व हा आकडा फुगत जायचा. आता शेतकरी हुशार झाले. शेतात पेरलेल्या पिकाचा विमा काढू लागले व अतिवृष्टीने किंवा अल्प पावसाने पीक गेले तर त्याला पीक विम्याचे कवच मिळाले. शासनाच्या वेगवेगळ्या योजना, अनुदानामुळेही शेतकरी सुखावला. पिकाला मिळणारा हमीभाव बाजारपेठेत त्याची होणारी लूटही कायद्याने खरेदी- विक्री आॅनलाईन करुन थांबविल्याने व्यापाºयाचा नफा कमी होऊन तो शेतकºयाच्या पदरात पडू लागला.खते, बी-बियाणे, औषधी यांची खरेदी- विक्री आॅनलाईन झाल्याने काळा बाजार मंदावला. शेततळी, सिंचन विहिरी, जलयुक्त शिवारअंतर्गत केलेली बंडींगची कामे याचाही आधार शेतकºयांना झाला.शेतकºयांच्या मुलांना शिक्षणामध्ये सवलत मिळाली. त्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला ही काही प्रमुख कारणे सांगता येतील.शेतीला पुरक योजना दुधाळ जनावरे, फळबागा ठिबक, तुषार यांचा पुरवठा करण्यात आला. कमी पावसात येणारे वाण बाजारात आल्याने शेतकºयांना फायदा झाला. १३ गावांतील शेतकºयांच्या जमिनीचे मोजमाप २०१७ पासून सुरू झाले.त्यामुळे जमिनीचा मोबदला चांगला मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या व मोबदला मिळालाही. या रकमेचा फायदा सामान्य शेतकºयांसह सधन शेतकºयांनाही झाला. त्याचबरोबर त्यांच्या लेकीबाळी पाहुणे यांनाही झाला.युवक मंडळी पारंपरिक शेती न करता नगदी पिकांकडे वळली. भाजीपाला घेत तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कमी पाण्यात चांगले उत्पन्न घेऊ लागले आहेत. आत्महत्या करणारी गावे पाहिली तर एकाच गावात वारंवार आत्महत्या घडल्या आहेत.यामध्ये हरडप, मनाठा, निवघा, चोरंबा (बु.), कोहळी, चिकाळा, कोहली, येवली, वायफना, तळेगाव, ल्याहरी, निमगाव, सावरगाव, बरडशेवाळा, पाथरड, पिंगळी, तळणी ही ठरलेली गावे आहेत. यामध्ये भीषण वास्तव म्हणजे मराठा समाजाच्या ४० आत्महत्या आहेत. हा चिंतनाचा विषय आहे.२४ शेतकरी कुुटुंबांना छदामही नाहीसन २०१३ मध्ये ८ आत्महत्या झाल्या. सन २०१४ हाच आकडा १५ वर गेला. सन २०१५ मध्ये २० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. सन २०१६ मध्ये हीच संख्या २३ वर गेली. परंतु, २०१७ मध्ये आकडा कमी झाला व ही संख्या १३ वर आली. सन २०१८ च्या चार महिन्यांत ५ आत्महत्या शेतकºयांनी केल्या. सहा वर्षातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी ८६ आहे. त्यापैकी ६० शेतकरी आत्महत्या प्रकरणे पात्र ठरली तर २४ प्रकरणे अपात्र ठरली. २ प्रकरणे कार्यवाही सुरू आहे. ज्या शेतकºयांची प्रकरणे पात्र ठरली त्यांच्या कुटुंबाना थोडीफार आर्थिक मदत शासनाकडून मिळाली. परंतु, २४ शेतकरी कुटुंबांना छदामही मिळाला नाही. त्यामुळे त्या कुटुंबांच्या अडचणीत वाढच झाली.सावकाराचा जाचक पाशही आवळला !शेतकºयाने आत्महत्या केली की त्यांच्या कुुटुंबाला आर्थिक मदत मिळते. त्यामुळे ते आत्महत्या करतात. असा सूर काही वर्षांपूर्वी निघत होता. परंतु, सन २००८ पासूनची अनेक प्रकरणे समितीने अपात्र ठरविल्यामुळे हा आरोप खोटा ठरतो. परंतु, या दोन वर्षांमध्ये आत्महत्येचे प्रमाण मात्र तालुक्यामध्ये कमी झाले आहे. सतत वाढणारा आकडा सन २०१७ मध्ये १३ वर आला. याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता शेतकºयांना मिळणारा पीक विमा. यामुळे अनेक शेतकºयांना पेरणीसाठी वरदान ठरला. खाजगी सावकाराचा जाचक पाशही कायद्याने तोडला.

टॅग्स :Nandedनांदेडhighwayमहामार्गfarmer suicideशेतकरी आत्महत्याfundsनिधी