शेतकऱ्याची भिस्त आता रबी हंगामातील हरभऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST2020-12-27T04:13:44+5:302020-12-27T04:13:44+5:30
शंकरनगर परिसरात बहुतांश शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे नैसर्गिक पावसावरच शेतकऱ्याची भिस्त आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र पावसाने कहरच ...

शेतकऱ्याची भिस्त आता रबी हंगामातील हरभऱ्यावर
शंकरनगर परिसरात बहुतांश शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे नैसर्गिक पावसावरच शेतकऱ्याची भिस्त आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र पावसाने कहरच केला संततधार पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकांची वाट लागली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मुबलक प्रमाणात पाऊस झाला असल्याने जमिनीत ओलावा कायम होता. त्यामुळे शेतकरी मूग, उडीद व सोयाबीनच्या रानात ज्वारी, करडी व हरभऱ्याची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. हरभरा पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कडाक्याची थंडी पडत असल्याने खरीप हंगामातील हरभरा जोमाने वाढला आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगाम वाया गेला असला तरी रबी हंगामातील हरभरा पीक साथ देईल, या अपेक्षेत आहे.