शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नेतृत्वासोबत विश्वास अन् निष्ठेचे होते नाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:36 AM

स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी कणखर नेत्या होत्या़ हा कणखरपणा शंकरराव चव्हाण यांच्यातही होता़ काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे़ नेतृत्वाचा शंकररावांवर भरवसा, विश्वास होता़ आणि शंकररावांची नेतृत्वावर निष्ठा होती़ कर्तृव्यदक्षता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि पक्षनिष्ठा या बाबी शंकररावांकडून शिकण्यासारख्या होत्या़ त्यामुळेच आजही राज्यभरातील कार्यकर्ते त्यांचे आवर्जुन स्मरण करतात़ अशा भावना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केल्या़

ठळक मुद्देशंकरराव चव्हाण यांची जयंती : अशोकरावांनी व्यक्त केली भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी कणखर नेत्या होत्या़ हा कणखरपणा शंकरराव चव्हाण यांच्यातही होता़ काँग्रेस आणि चव्हाण कुटुंबीय यांचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे़ नेतृत्वाचा शंकररावांवर भरवसा, विश्वास होता़ आणि शंकररावांची नेतृत्वावर निष्ठा होती़ कर्तृव्यदक्षता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि पक्षनिष्ठा या बाबी शंकररावांकडून शिकण्यासारख्या होत्या़ त्यामुळेच आजही राज्यभरातील कार्यकर्ते त्यांचे आवर्जुन स्मरण करतात़ अशा भावना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केल्या़शंकरराव चव्हाण यांची शनिवारी ९८ वी जयंती साजरी होत आहेत़ जयंतीच्या पूर्वसंध्येला खा़चव्हाण यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला़ मराठवाड्याच्या पाटबंधारे विकासाचा इतिहास ही शंकररावांच्या कर्तृत्वाची मालिका आहे़ मानार, येलदरी, सिद्धेश्वर, जायकवाडी, मांजरा यासारखे कितीतरी प्रकल्प त्यांच्यामुळे पूर्णत्वास आले़ या प्रकल्पांसाठी ते सातत्याने पाठपुरावा करायचे़ नांदेडसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बागायतीचा अनुभव नव्हता़ मात्र शंकररावांच्या नेतृत्वाखाली सिंचनाची चळवळ उभी राहिली आणि हा परिसर झपाट्याने बदलला़शंकरराव पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले़ पक्षानेही त्यांच्यावर तेवढाच विश्वास टाकत अनेक महत्त्वाच्या जबाबदाºया सोपविल्या आणि नेतृत्वाने सोपविलेल्या जबाबदाºया नेतृत्वावर विश्वास टाकत तितक्याच निष्ठेने शंकररावांनी पार पाडल्या़ कार्यकर्त्यांसोबत आपले नाते कसे असावे याचाही पाठ त्यांनी घालून दिला़ राज्यभरात त्यांचे कार्यकर्ते विखुरलेले होते़ त्यातील अनेकांसोबत त्यांचे वैयक्तिक पातळीवर संबंध होते़ अगदी कुटूंबाप्रमाणे ते कार्यकर्त्यांशी ख्याली-खुशाली विचारायचे़ स्वभावाने कणखर असले तरी तितक्याच मायेने ते कार्यकर्त्यांवर प्रेम करायचे़ आणि त्यामुळेच राज्यभरातील कार्यकर्ते आज त्यांचे स्मरण करत असताना दिसतात़नांदेड महानगरपालिकेने अनधिकृत बॅनर्सवर कारवाईचा निर्णय घेतला आहे़ या अनुषंगाने आम्ही कार्यकर्त्यांना शंकररावांच्या जयंतीनिमित्ताने अनधिकृत बॅनर्स लावू नका असे आवाहन केले होते़ आज शहरात पाहिले असता कार्यकर्त्यांनी या सूचनेचे पालन केल्याचे दिसून आले़ ही शंकररावांवरील निष्ठा, आत्मीयतावच असल्याचेही खा. अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले़लोकांचे चव्हाण कुटुंबियावर प्रेम आहे़ नांदेडसह या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शंकरराव चव्हाण यांनी मोठे योगदान दिले आहे़ या परिसराच्या विकासासाठी त्यांनी दाखविलेल्या मार्गाने यापुढील काळातही कार्यरत राहून त्यांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करु, असा शब्दही खा़अशोकराव चव्हाण यांनी यावेळी दिला़---नवीन मोंढा मैदानावर आज महारक्तदान शिबीरमाजी केंद्रीय गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी सकाळी ९ वाजता नवा मोंढा मैदानावर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे़ त्याचबरोबर जिल्हाभरात शैक्षणिक संस्था, कार्यालये येथे कार्यक्रम होणार आहेत़युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होईल़ अध्यक्षस्थानी आ. अमिता चव्हाण या राहणार आहेत़ शारदा भवन शिक्षण संस्था आयटीएम कॉलेज व कै.पद्मीनबाई देशमुख सेवाभावी संस्था, चिकाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयटीएममध्ये दुपारी २ वाजता खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे़

टॅग्स :NandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण