बालाजीच्या भाविकांची सोय; नांदेडहून तिरुपतीसाठी ४ जुलैपासून दोन विशेष रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:10 IST2025-07-01T13:02:14+5:302025-07-01T13:10:02+5:30
या विशेष गाड्यांमध्ये एसी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी व तृतीय श्रेणीसह स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.

बालाजीच्या भाविकांची सोय; नांदेडहून तिरुपतीसाठी ४ जुलैपासून दोन विशेष रेल्वे
नांदेड : तिरुपती येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे नांदेड येथून दोन विशेष गाड्या ४ जुलै ते २७ जुलै या कालावधीत सोडण्यात येणार आहेत. या २४ दिवसांच्या कालावधीत विशेष गाड्या १६ फेऱ्यांद्वारे प्रवाशांची ने-आण करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
गाडी क्रमांक ०७१८९ ही नांदेड स्थानकातून शुक्रवारी दुपारी ४:३० वाजता सुटेल, तर परतीच्या प्रवासात ०७१९० ही गाडी तिरुपती येथून शनिवारी दुपारी २:२० वाजता निघेल. दरम्यान, दुसरी विशेष गाडी क्रमांक ०७०१५ नांदेड येथून शनिवारी सायंकाळी ४:५० वाजता तर तिरुपती येथून गाडी क्रमांक ०७०१६ रविवारी सायंकाळी ४:४० मिनिटांनी सुटेल. दोन्ही गाड्या मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, चेरलापल्ली, नलगोंडा, मिर्यालागुडा, नाडीकुडे, पिदुगुरल्ला, नेमलीपुरी, रोमपिचेर्ला, विनुकोंडा, डोनाकोंडा, मरकापूरम रोड, कुंबम, गिद्दलूर, दिगुवामेट्टा, नंदयाल, जम्मालामादुगु, येरागुंतला, कडप्पा, नांदलूर, रझाम्पेटा, कोदुरू आणि रेनिगुंटा या स्टेशन दोन्ही दिशांना थाबतील.
या विशेष गाड्यांमध्ये एसी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी व तृतीय श्रेणीसह स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. दोन्ही गाड्या प्रत्येकी ८ फेऱ्या पूर्ण करणार असून प्रवाशांनी विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.