शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा बंडखोरांना दणका; पक्षादेश न पाळणाऱ्या नांदेडच्या पाच जणांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 11:27 IST

पक्षादेश न पाळल्यामुळे भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी; नांदेडच्या पाच जणांचा समावेश

नांदेड : पक्षाचा आदेश न पाळल्यामुळे भाजपाने राज्यातील ४० जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. यामध्ये सर्वाधिक पाच जण नांदेड जिल्ह्यातील आहेत. विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी उफाळली आहे. नांदेडमध्ये भाजपसह शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत निवडणूक रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. परंतु या बंडखोरांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु पक्ष आदेश न पाळता नांदेड उत्तरसहनांदेड दक्षिणमध्ये पाच जणांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे भाजपने या पाच जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. 

भाजपा हा शिस्तीचा पक्ष असून आपण पक्षाची शिस्तभंग केली असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर सदर कारवाई करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे.नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मिलिंद देशमुख, वैशाली देशमुख यांच्यासह नांदेड दक्षिण मधील दिलीप कंदकुर्ते सुनील मोरे आणि संजय घोगरे या पाच जणांचा समावेश आहे.

बंडखोरीनंतरही मिळाले होते प्रमोशन भाजपचे विद्यमान महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी बंडखोरी करत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत कंदकुर्ते यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या राजश्री पाटील यांचा पराभव झाला होता. परंतु त्यानंतरही पक्षाने त्यांच्यावर महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. बंडखोरीनंतरही प्रमोशन मिळाल्याने कंदकुर्ते यांनी या निवडणुकीत पक्षादेश पाळला नसावा, अशी चर्चा भाजप वर्तुळात सुरू होती. मात्र, यावेळी  भाजपने कारवाई करत त्यांची हकालपट्टी केली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यावरही राहणार 'वॉच'नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर मध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडखोरी पाहता त्यांच्या निवडणूक प्रचारात कोणकोणते पदाधिकारी सक्रीय राहतात, यावर देखील भारतीय जनता पक्षाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर थेट शिस्तभंग आणि हकालपट्टीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील पक्षश्रेष्ठींनी दिला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकBJPभाजपाnanded-north-acनांदेड उत्तरnanded-south-acनांदेड दक्षिण