भोकर रेल्वेस्थानकावर दोन महिन्याच्या 'नकोशी'ला खुर्चीखाली सोडून अज्ञाताचे पलायन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 04:03 PM2017-11-03T16:03:05+5:302017-11-03T16:04:37+5:30

भोकर येथील रेल्वेस्थानकात खुर्च्याखाली ठेवण्यात आलेली एक दोन महिन्याची 'नकोशी' आढळून आली.

Execution of two month old 'baby' leaving Bhokkar railway station under the chair | भोकर रेल्वेस्थानकावर दोन महिन्याच्या 'नकोशी'ला खुर्चीखाली सोडून अज्ञाताचे पलायन 

भोकर रेल्वेस्थानकावर दोन महिन्याच्या 'नकोशी'ला खुर्चीखाली सोडून अज्ञाताचे पलायन 

googlenewsNext
ठळक मुद्देया बालिकेस स्टेशनवरील अंधाराचा फायदा घेत अज्ञाताने ठेवले असावेरात्री १०.30च्या दरम्यान जुनेद पटेल यांना प्लेटफार्म क्र. १ वर प्रवाशांसाठी बसण्यास असलेल्या खुर्चीखाली एका बालिका बेवारस अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले.

नांदेड : भोकर येथील रेल्वेस्थानकात खुर्च्याखाली ठेवण्यात आलेली एक दोन महिन्याची 'नकोशी' आढळून आली. गुरुवारी रात्री १०.३० च्या दरम्यान सापडलेल्या या बालिकेस स्टेशनवरील अंधाराचा फायदा घेत अज्ञाताने ठेवले असावे असा कयास असून या प्रकरणी रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, मुदखेड ते अदिलाबाद या रेल्वे लाईनवरील भोकर रेल्वे स्थानक आहे . गुरुवारी रात्री १०.30च्या दरम्यान जुनेद पटेल यांना प्लेटफार्म क्र. १ वर प्रवाशांसाठी बसण्यास असलेल्या खुर्चीखाली एका बालिका बेवारस अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. जुनेद यांनी तात्काळ याची माहिती स्थानक प्रमुखांना दिली. यानंतर रेल्वे कर्मचारी शेख मिया शेख छोटू यांच्या मदतीने जुनेद यांनी या नवजात बालीकेस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.  रात्रभर रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्या नंतर  बालिकेस आज सकाळी नांदेड येथील केअर युनिट पथकाच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी रेल्वे पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. 


सीसीटीव्ही नसल्याने तपासात अडचण 
भोकर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या स्थानकावर दिवसभर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रात्रीच्या वेळी प्रवाशांची संख्या कमी असते. यामुळे अनेकदा स्थानकावर अपराधिक घटना घडत असतात. मात्र, स्थानकावर सीसीटीव्ही नसल्याने याबाबत काही ठोस पुरावे हाती लागत नाहीत. यावेळीही बालिकेला सोडणा-यांनी अंधाराचा फायदा घेत तिला येथे सोडले.

Web Title: Execution of two month old 'baby' leaving Bhokkar railway station under the chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.