शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

माजी ऑफीसबॉयचा कारनामा, बिल्डरच्या कार्यालयात २२ लाखांची चोरी करून तिरुपती वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 16:01 IST

सन्मान कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात असलेल्या बाथरुमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी असलेल्या छोट्या खिडकीतून चोरट्याने आत प्रवेश केला होता.

नांदेड :  शहरातील रेल्वेस्टेशन रस्त्यावर असलेल्या सन्मान कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयातून शनिवारी रात्री २२ लाख रुपये लंपास करण्यात आले होते. या प्रकरणात एक आरोपी हा चोरीनंतर दर्शनासाठी थेट तिरुपतीला गेला होता, तर दुसरा मुदखेड येथेच थांबला होता. स्थानिक गुन्हे शाखा आणि वजिराबाद पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून चोरीतील १७ लाख ४१ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. 

सन्मान कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात असलेल्या बाथरुमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी असलेल्या छोट्या खिडकीतून चोरट्याने आत प्रवेश केला होता. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे बंद करुन २२ लाख रुपये लंपास केले होते. या प्रकरणात नंदकुमार गाजुलवार यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वजिराबाद पोलिस तपास करीत होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच खबऱ्यांकडून माहिती काढली. त्यात अंकुश पांडुरंग माेगले हा चोरीनंतर थेट तिरुपतीला गेला होता, तर शिवदास पूरभाजी सोनटक्के हा मुदखेड येथेच होता. पोलिसांनी दोघांनाही पकडले. त्यानंतर पोलिसांनी दोघांकडून १७ लाख ४१ हजार रुपये जप्त केले. पोनि. द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. पांडुरंग माने, पोउपनि. दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, जसवंतसिह शाहू, संजय केंद्रे, गुंडेराव करले, गंगाधर कदम, शंकर म्हैसनवाड, सखाराम नवघरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोपी वर्षभरापूर्वी होता बिल्डरकडे कामालाआरोपी शिवदास पूरभाजी सोनटक्के हा वर्षभरापूर्वी सन्मान कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात ऑफीसबॉय म्हणून कामाला होता. परंतु नंतर त्याने हे काम सोडले. त्यामुळे कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे कुठे लावले आहेत? रक्कम कुठे ठेवली जाते, प्रवेश कसा करायचा, याबाबत इत्यंभूत माहिती होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद