शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

मनाच्या दालनात प्रत्येकाला दिली एैसपैस जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:40 AM

मराठी गझलचे नाव निघाल्यानंतर सुरेश भटानंतर नाव निघते ते ईलाही जमादार यांचे. १९६४ पासून काव्यलेखन करणाऱ्या जमादार यांच्याकडे अक्षरश: शब्दसोन्याची खाण आहे. मराठी गझलेच्या तंत्र आणि शास्त्राचा विषय निघतो तेव्हाही त्यांचेच नाव पुढे येते. अशा प्रसिद्ध गझलकार ईलाही जमादार यांच्याशी साधलेला हा संवाद...

अत्यंत भावस्पर्शी कविता आणि गझल ही आपली ओळख आहे. या गझल लेखनाची सुरुवात कशी झाली?नोकरीमुळे कुटुंबापासून दूर राहत होतो. दिवस कामामध्ये निघून जायचा. मात्र कामावरुन घरी परतल्यानंतर एकटेपणा जाणवायचा. यातूनच वाचन-लिखाणाची आवड लागली. ज्या भावना मनामध्ये उमटतात, जे अनुभव आयुष्यामध्ये येतात तेच मी शब्दबद्ध करीत गेलो. एके दिवशी माझ्या एका मित्राने हे लिखाण पाहिले आणि कविता भावस्पर्शी असल्याचे सांगितले. तेव्हाच मला माझे लिखाण कविता आहे, हे समजले.आपणाला या लिखाणासाठी कोणाकडून मार्गदर्शन मिळाले?मनातील भाव-भावना कागदावर उमटवित मी गझललेखन करीत गेलो. एके दिवशी डॉ. नाडकर्णी यांचा उर्दू मुशायराचा कार्यक्रम होता. तेथे गेल्यानंतर मी माझ्या हातातील कविता त्यांना दाखवित कविता वाचनाची संधी मागितली. त्यांनी सदर कार्यक्रम मुशायºयाचा असल्याचे सांगून मला घरी येवून भेटण्यास सांगितले आणि गझल लेखनाबाबत मार्गदर्शन केले.आपले पुढील प्रकल्प काय आहेत?गझलची १५ तर उर्दूतील एका पुस्तकाचे लिखाण झाले आहे. नवोदित मराठी कवींसाठी गझल क्लिनिक ही कार्यशाळा मी घेत असतो. गझल लेखनाकडे तरुणाई वळावी, त्यांना नेमके मार्गदर्शन मिळावे यासाठी या कार्यशाळा अधिकाधिक व्हाव्यात, असा माझा प्रयत्न असतो. यापुढेही तो राहील. जो भेटेल त्याला मनापासून आपलासा करीत गेलो. यापुढेही अनेकांना तेथे जागा मिळेल.गझलमध्ये भावनेला महत्त्वगझलेच्या तंत्राचा आणि शास्त्राचा विषय निघतो तेव्हा मी गझलमध्ये सर्वाधिक महत्त्व भावनेला देतो. तुमच्या मनातील भावना किती तीव्र आहेत त्यावरच लिखाणाची खोली अवलंबून असते. मी कधीही ठरवून लिहिले नाही.निसर्ग देतो आणि त्याने सांगितल्याप्रमाणे मी कागदावर उतरवित जातो. यात माझे स्वत:चे काही आहे असे मला वाटत नाही. सुरुवातीच्या लिखाणानंतर अधिकाधिक प्रगल्भता येत गेली. शब्दावरही मेहनत घेतली. त्यामुळेच या शब्दांना नजाकत मिळाल्याच्या भावनाही ईलाही जमादार यांनी व्यक्त केल्या.

प्रत्येकाच्या आयुष्यात सुख असते तसेच त्याच्या आयुष्याला दु:खाचीही किनार असते. या सुख-दु:खाकडे तुम्ही कसे पाहता ते महत्त्वाचे आहे. माझ्या बाबतीत विचाराल तर माझे दु:खच मी लेखणद्वारे कागदावर उतरवितो. ही वेदना कविता बनते आणि याच कवितेची पुढे गझल होते. -इलाही जमादार

टॅग्स :Nandedनांदेडliteratureसाहित्य