शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
2
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
3
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; तुरुंगात प्रियकरासाठी केली ही मागणी
4
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
5
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
6
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
7
भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
8
Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? पटापट चेक करा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, ४ डिसेंबर २०२५: अचानक धनप्राप्ती अन् विविध फायदे होतील, ज्याने आनंदित व्हाल
10
Orange Gate Tunnel: सोळा मजली उंच इमारतीइतक्या खोल, ७०० इमारतींखालून जाणार ऑरेंज गेट बोगदा
11
Bike Taxi: बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपिडो, उबेर 'ला बसणार दणका; कंपन्यांवर गुन्हे दाखल होणार
12
संयुक्त राष्ट्रात १० दिवसांत भारताविरोधात ३ प्रस्ताव; रशियानं 'व्हेटो' वापरत निभावली मैत्री
13
प्रशिक्षणादरम्यान F-16C लढाऊ विमान वाळवंटात कोसळलं; कॅलिफोर्नियातील थरारक घटना!
14
रुपया नव्वदीपार, गाठला ऐतिहासिक तळ; महागाई वाढणार, विद्यार्थ्यांपासून गृहिणींपर्यंत सर्वांना बसणार फटका
15
हळद पिवळी पोर कवळी...! तेजस्वीनी लोणारीची लगीनघाई, हळदी समारंभाचे फोटो समोर
16
शेतकरी मदतीचा मुद्दा गाजला; कृषिमंत्री आधी म्हणाले, ‘नाही’ नंतर म्हणाले, ‘हो, प्रस्ताव आला’
17
चापलूस एआय तुमची हुजरेगिरी करायला सोकावले आहे!
18
लंकादहन: भाजप-शिंदेसेनेतील वाद गाजला, सत्तापक्षांतील वादांचे निवडणुकीत झाले प्रदर्शन
19
विशेष लेख: व्हेंटिलेटरवर ठेवलेली ‘राज्यघटना’ समजून घेताना...
20
Indigo Flights Issue: ...म्हणून इंडिगोची सेवा ढेपाळली; १०० पेक्षा जास्त विमाने झाली रद्द
Daily Top 2Weekly Top 5

पोहता येत नसतानाही गोदापात्रात उतरने जीवावर बेतले; विष्णूपुरीत दोन तरुणांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2022 17:06 IST

धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही परिवारावर शोककळा पसरली आहे.

नांदेड: पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरूण मित्रांचा काळेश्वर मंदिराच्या मागील गोदावरी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी  घडली. जय रूपेश पुजारी (१९), व त्याचा मित्र गजानन राजू हाटकर (२८) असे मृत मुलांचे नाव आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या विजय नगरातील रहिवासी जय रूपेश पुजारी (वय- १९ वर्षे), व त्याचा मित्र गजानन राजू हाटकर (वय-२८, रा. दत्त नगर, नांदेड) हे दोघे शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी विष्णूपुरी शिवारातील काळेश्वर मंदिर परिसरात गेले. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही गोदावरी पात्रात बुडून अंत झाला, अशी माहिती ठाणे अंमलदार तथा सहाय्यक पोउपनि. ज्ञानोबा गिते व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली आहे. 

धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या दुख:द घटनेमुळे पुजारी आणि हाटकर यांच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. प्र. पो.नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संजय रामदिनेवार हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरण