शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ४२ चौक्यांची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 19:51 IST

जिल्ह्यात वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक वाळू वाहनांची होणार तपासणी

- अनुराग पोवळे

नांदेड : जिल्ह्यात एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नसताना मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळू चोरी आणि अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाने जिल्ह्यात ४२ ठिकाणी संयुक्त चौक्या उभारल्या आहेत. या ठिकाणाहून जाणाऱ्या प्रत्येक वाळू वाहनांची तपासणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्यात वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत राजकीय कलगीतुराही अनेकदा रंगला आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नूतन जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी जिल्ह्यातील वाळू चोरीचा विषय गांभीर्याने घेताना जिल्ह्यातील सर्व विभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार यांची बैठक घेवून वाळू चोरीवर आळा घालण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ४२ चौक्या उभारण्यात येणार आहेत. या चौक्यांमध्ये नांदेड तालुक्यात ८ चौक्या राहणार आहेत. त्यात असर्जन येथील जुना जकात नाका, निळा रोड येथील जयभवानी चौक, वाय पॉर्इंट, पासदगाव येथील जाधव पेट्रोलपंप, कामठा येथील शंकरराव चव्हाण चौक, ब्रह्मपुरी येथील बोंढार ब्रीजजवळ, धनेगाव चौरस्ता येथील वाघाळेकर पेट्रोलपंप, हस्सापूर टी पॉइंट आणि वाजेगाव चौरस्ता येथे चौक्या राहणार आहेत.

भोकर तालुक्यात उमरी टी पॉइंट, उमरी रोड, मुदखेड तालुक्यात आमदुरा, हदगाव तालुक्यात उमरखेड पॉइंट, बामणी फाटा आणि तामसा येथे तामसा चौक, हिमायतनगर तालुक्यात पळसपूर चौक, कामारी चौक, किनवट तालुक्यात कोठारी चि., घोटी, माहूर तालुक्यात केरोळी फाटा, लांजी पॉइंट, कंधार तालुक्यात गोळेगाव पाटी, तेलूर फाटा, लोहा तालुक्यात शिवाजी चौक लोहा, माळेगाव, सोनखेड आणि मारतळा (हातणी पाटी), देगलूर तालुक्यात सांगवी उमरी गावात शेवाळा नंदूर रस्त्यावर, धर्माबाद तालुक्यात बाभळी चौक, राजापूर, सिरजखोड फाटा, उमरी तालुक्यातील कारेगाव फाटा, बळेगाव चौक, हातणी चौक, बिलोली तालुकतील हुनगुंदा, जुने गावठाणजवळ, येसगी मांजरा नदीजवळील पुलाजवळ, आदमपूर, नरसी ते देगलूर रोडवर, आदमपूर कमान, लोहगाव फाटा आणि  नायगाव तालुक्यातील वजिरगाव फाटा, बळेगाव व गडगा येथे या चौक्या राहणार आहेत. 

वाळू वाहतूक होणाऱ्या भागांचा आढावाजिल्हाधिकारी डॉ. ईटणकर यांनी ज्या भागातून वाळू वाहतूक होते त्या भागातील चौक्यांची माहिती मागवली होती. या चौक्यावर पोलीस, महसूल  आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे संयुक्त पथक तैनात करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. पोलीस व महसूल विभागाने संयुक्त पाहणी करुन पहिल्या टप्प्यात ४२ चौक्यांची ठिकाणे निश्चित केली असल्याचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. या चौक्यांमध्ये आणखी वाढ केली जाईल, असेही मगर यांनी सांगितले. 

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडsandवाळू