नांदेड शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 18:19 IST2019-01-11T18:18:54+5:302019-01-11T18:19:27+5:30
मुख्य बाजारपेठ असलेल्या वजीराबाद भागात रस्त्यावर थाटलेल्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले

नांदेड शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
नांदेड- शहरातील मुख्य रस्त्यावर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून या विरोधात शहर वाहतूक शाखेने मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी फुटपाथवरिल विक्रेत्यांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
शहरातील अतिक्रमण हटविण्याची मुख्य जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची असताना मनपा कडून मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शहर वाहतूक शाखेच्या पत्रांनाही मनपा कडून केराची टोपली दाखविण्यात येत असल्यामुळे शहर वाहतूक शाखेनेच अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी मुख्य बाजारपेठ असलेल्या वजीराबाद भागात रस्त्यावर थाटलेल्या विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.