शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

आजोळातील अन्न-पाण्याशी राखले इमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 01:29 IST

शिवराज रामचंद्र भंडरवाड. वय वर्षे १६. जन्म आजोळी झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. राहायला पक्के घरदेखील नाही. त्यामुळे आजी-आजोबांनीच संगोपन केले. दहावीत शिकतानाच सुटीच्या दिवशी आजोबांच्या शेळ्या राखतो. २० आॅगस्ट रोजीही तो शेळ्या घेऊन गावाकडे परतत होता. गावातील दोघे पुरात वाहून जात असल्याचे पाहून त्याने जिवाची पर्वा न करता या दोघांना मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढले.

ठळक मुद्देजिगरबाज शिवराजने जागवल्या पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या दोघांना वाचविल्याच्या आठवणी

वसंत जाधव/बालाजी मांजरमकर।लोकमत न्यूज नेटवर्कगडमा/मांजरम: शिवराज रामचंद्र भंडरवाड. वय वर्षे १६. जन्म आजोळी झाला. घरची आर्थिक स्थिती बेताचीच. राहायला पक्के घरदेखील नाही. त्यामुळे आजी-आजोबांनीच संगोपन केले. दहावीत शिकतानाच सुटीच्या दिवशी आजोबांच्या शेळ्या राखतो. २० आॅगस्ट रोजीही तो शेळ्या घेऊन गावाकडे परतत होता. गावातील दोघे पुरात वाहून जात असल्याचे पाहून त्याने जिवाची पर्वा न करता या दोघांना मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढले.शिवराजच्या या धाडसाची ही कहाणी सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे. शिवराजने ‘लोकमत’जवळ त्या दिवशीचा थरार सांगितला.शिवराज मांजरम (ता.नायगाव) येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकतो. देगाव (ता.नायगावचा) हे त्याचे मूळ गाव. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची़ वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. त्यामुळे शिवराज अंगणवाडीपासून आजोबा रामू गंगाराम केशवमोड यांच्याकडेच राहतो. केशवमोड हे देखील मजुरीचे काम करतात़ २० आॅगस्ट रोजी त्याचे आजोबा बाहेरगावी गेल्याने शाळेत पहिला तास संपल्यावर वर्गशिक्षक विजय काळे यांची परवानगी घेऊन शिवराज ४० शेळ्या चारण्यासाठी माळरानावर गेला. सकाळी ११ वाजता एका शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला़ मात्र पाऊस सुरू झाल्याने गावाकडे येता आले नाही. सायंकाळी पाच वाजता पाऊस कमी झाल्यावर तो ४० शेळ्यांना घेऊन गावाकडे जात होता.रस्त्यावरील एका पुलावरून पाणी वाहत असल्याने तो तिथेच थांबला. त्याच्यापाठोपाठ मजुरीचे काम करणारे भूमिहीन मजूरदार नामदेव कोंडिबा वंजारे (४८, रा.मांजरम) हे माधवराव उद्धवराव शिंदे यांच्या बैलांना घेवून गावाकडे निघाले होते. बैल न थांबल्याने वंजारेदेखील पुलावरून जात असताना वेगातील पाण्याच्या प्रवाहात ते पडले. ते वाहून जात असल्याचे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता शिवराजने त्यांना बाहेर काढले. थोड्या वेळाने नामदेव गावाकडे आले. परंतु, शेळ्या जवळ असल्याने शिवराज तिथेच थांबला. काही वेळानंतर शेळीपालक व्यंकट लक्ष्मण विभूते (६०, रा.मांजरम) हे एक म्हैस व शेळ्यांना घेऊन गावाकडे जाण्यासाठी पुलाच्या अगदी जवळ थांबले असता पुलावरुन त्यांची म्हैस खाली पडली. पाठोपाठ पुलाचा काही भाग कोसळला.यातच विभूते पुराच्या पाण्यात पडले. ही घटना पाहून शिवराजने पुन्हा एकदा पाण्यात उडी घेतली़ तोपर्यंत विभूते यांनी दोन गटांगळ्या खाल्ल्या होत्या. तरीही शिवराजने त्यांना पकडून पोहत-पोहत विभूते यांनादेखील सुरक्षितपणे बाहेर काढले. या पुरात विभूते यांच्या चार शेळ्या वाहून गेल्या. या दोन्ही घटनांत मदत करताना शिवराजच्या आजोबाचा शेळ्यांमधील एक बोकड पुरात वाहून गेला. शिवराजच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शाळेने केला सत्कारया घटनेनंतर दुसºया दिवशी शाळेत शिवराज उशिराने आल्यामुळे शिक्षकांनी त्यास कारण विचारले.शिवराजने घडलेली हकीकत सांगितली.त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक भुजंग सोनकांबळे यांनी शिवराजच्या धाडसाचे कौतुक करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि ज्येष्ठांना ही माहिती दिली. या सर्व मंडळींनी शाळेत शिवराजचा कौतुक सोहळा घेतला. शिवराजला बालशौर्य पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी शाळेने व गावकºयांनी लेखी निवेदनाद्वारे लोकप्रतिनिधी व शासनाकडे केली आहे.अख्खी रात्र काढली जागूनशिवराजने सोबत शेळ्या असल्यामुळे व पुराचे पाणी कमी न झाल्याने व्यंकट विभूते यांच्यासह संपूर्ण रात्र मांजरम शिवारात जागून काढली. पहाटे तीननंतर ही मंडळी घराकडे परतली. 

आजोबांचेच योगदानया चांगल्या कामात आजोबांचेच खरे योगदान म्हणावे लागेल़ त्यांनी शाळेला सुटी घेऊन शेळ्या चारवण्यासाठी जाण्यास सांगितले़ म्हणून मी शेताकडे गेलो आणि या घटनेतून दोघांना वाचविले-शिवराज रामचंद्र भंडरवाड 

शिवराज देवरूपात धावला !पुलावरून कमरेएवढे पाणी वाहत होते. आम्हाला वाचतो असे वाटले नाही. पाण्याचा वेग जास्त होता. त्यावेळी शिवराज आमच्यासाठी देवरुपात धावून आला. त्याने स्वत: चा जीव धोक्यात घालून आम्हाला वाचविले. शिवराजच्या कामाबद्दल त्याचे कौतुक करायला आमच्याकडे शब्दच नाहीत. गावच्या बाईलेकीचं हे लेकरू खूप मोठ्ठं होवो.व्यंकट लक्ष्मण विभूते, नामदेव कोंडिबा वंजारे (रा.मांजरम.)

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसWaterपाणी