हैदराबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील - अशोकराव चव्हाण- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:20 IST2021-09-18T04:20:04+5:302021-09-18T04:20:04+5:30

नांदेड महानगरपालिकेच्यावतीने आयोजित शहरातील महात्मा फुले मार्केट पुनर्विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, ...

Efforts are being made for Hyderabad-Nanded Green Field route - Ashokrao Chavan - Public Works Minister Ashok Chavan | हैदराबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील - अशोकराव चव्हाण- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

हैदराबाद-नांदेड ग्रीन फिल्ड मार्गासाठी प्रयत्नशील - अशोकराव चव्हाण- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

नांदेड महानगरपालिकेच्यावतीने आयोजित शहरातील महात्मा फुले मार्केट पुनर्विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अशोकराव चव्हाण म्हणाले, लोकसंख्येच्या वाढत्या गरजेनुसार विविध सेवा व सुविधा महानगरपालिकेअंतर्गत उपलब्ध करून देताना त्यातील गुणवत्ता व सातत्य जपणे हे अधिक महत्त्वाचे आहे. याचबरोबर ज्या सुविधा पुरविल्या जात आहेत त्यांचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेसारख्या स्वायत्त संस्थाना उत्पनाची साधने वाढविण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नांदेड येथील महात्मा फुले मार्केट पुनर्विकास योजनेतून जुन्या भाडेकरूंना सामावून घेत याठिकाणी निर्माण होणारे नवीन व्यापारी संकुल हे नांदेडच्या वैभवाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुमारे पन्नास हजार चौ.फूट जागेचे हे बांधकाम एका वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प आहे. लोकांनी याला चांगले सहकार्य केले तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. याचबरोबर मनपाचीही तेवढीच जबाबदारी आहे. चांगल्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात जर कुणाचा अडथळा येत असेल, तर अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करून सुविधा व कामाच्या दर्जेला प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मनपाला केल्या. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी या व्यापारी संकुलाची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत केले.

चाैकट...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: मराठवाडा विकासासाठी दक्ष असून या भागातील विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहे. नांदेड-जालना समृद्धी महामार्गाला त्यांनी तत्काळ मंजुरी देऊन ही कटिबध्दता अधिक दृढ केली आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग हा मुंबई, पुणेसह जवळ असलेल्या हैदराबाद महानगराच्या रस्ते विकासातून अधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

Web Title: Efforts are being made for Hyderabad-Nanded Green Field route - Ashokrao Chavan - Public Works Minister Ashok Chavan