देगलूर तालुक्यात चहाच्या कारणावरुन जबर मारहाण, मुलगी दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:36 IST2018-04-20T00:36:09+5:302018-04-20T00:36:33+5:30
चहा न दिल्याच्या कारणावरुन ११ वर्षीय मुलीला जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शहापूर ता. देगलूर येथे मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.

देगलूर तालुक्यात चहाच्या कारणावरुन जबर मारहाण, मुलगी दगावली
लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर : चहा न दिल्याच्या कारणावरुन ११ वर्षीय मुलीला जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शहापूर ता. देगलूर येथे मंगळवारी घडली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला.
यात गंगाबाई व्यंकन्ना जाधव(वय ८०) ही वृद्धाही जखमी झाली. जखमी वृद्धा व आरोपी यांच्यात नातू- आजीचे नाते आहे तर मृत काजल बाबू गाडगे (वय ११) ही पुतणी आहे. मंगळवारी आरोपी सुरेश बालाजी गाडगे याने उपरोक्त कारणावरुन आजी गंगाबाई हिला घरातील मुसळाने मारहाण केली. तसेच पुतणी काजललाही जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर काजलला देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला.
पोलिसांनी गंगाबाई जाधव यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. पोलिस उपनिरीक्षक मराडे, जमादार तोरणे, पोकाँ सुपारे, गायकवाड यांनी आरोपीस अटक करुन न्यायालयात उभे केले. न्यायालयाने त्याला ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.पोलिस तपास करीत आहेत.