शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
2
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
3
नद्यांना गतवैभव मिळवून देणार: मुख्यमंत्र्यांची ग्वाही; पाच ठिकाणी नालेसफाईचा पाहणी दौरा
4
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
5
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
6
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
7
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
8
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
9
विशेष लेख: ‘बाळ’ नव्हे, बाळाचा बापच खरा गुन्हेगार! मुले हाताबाहेर गेली तर दोष कुटुंबाचाच...
10
ठाणे डायरी | उन्हाळ्यात पाणी टंचाईला सुरुवात; ठाणेकर तहानलेले, मुंबईकर किती पाणी ढोसणार?
11
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही
12
अग्रलेख: दुष्काळात खाडा महिना! अलीकडच्या काळात दुष्काळात पाण्याची टंचाई हा कळीचा मुद्दा
13
मुक्काम पोस्ट महामुंबई | डोंबिवली स्फोट: जाओ, पहले उस आदमी का साइन लेकर आओ...
14
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
15
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
16
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
17
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
18
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
19
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
20
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 

नांदेडमध्ये पीकविमा भरण्यात ‘सर्व्हर’ चा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:33 AM

आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ यंदा जवळपास ८० हजार शेतक-यांनी पीकविमा भरला असून शेवटच्या ११ दिवसांत उर्वरित शेतक-यांचा पीकविमा भरणे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़

ठळक मुद्देगतवर्षी साडेदहा लाख शेतकऱ्यांचा समावेश

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आॅनलाईन सातबारा मिळत नसल्याने शेतक-यांना पीककर्ज घेण्यासह पीकविमा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे़ त्यातच सर्व्हर डाऊन असल्याने पीकविमा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत बसावे लागत आहे़ गतवर्षी जिल्ह्यातील १० लाख ४० हजार ६१७ शेतक-यांनी पीकविमा भरला होता़ यंदा जवळपास ८० हजार शेतक-यांनी पीकविमा भरला असून शेवटच्या ११ दिवसांत उर्वरित शेतक-यांचा पीकविमा भरणे होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप-२०१८ मध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे़ सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर, हरभरा आदी खरीप पिकांचा या योजनेत समावेश केला आहे़ नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास साडेसहा लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे़ परंतु, त्या तुलनेत शेतकºयांनी पिकांचा विमा उतरविला नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़बँकेत पीकविमा भरण्याची अंतिम तारीख कर्जदार शेतकºयांसाठी ३१ जुलै तर बिगरकर्जदार शेतकºयांना पीकविमा उतरवण्याची २४ जुलै अंतिम तारीख देण्यात आली आहे़मागील वर्षी १० लाखांहून अधिक शेतकºयांनी पीकविमा भरला होता़ त्यापैकी ७ लाख ४३ हजार ५९५ शेतकºयांना ५४२ कोटी ७५ लाख रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे़ ऐन पेरणीच्या काळात पीकविमा मिळाल्याने बहुतांश शेतकºयांची पेरणी आनंदात झाली़यंदा पीकविमा भरण्यास अडचणी येत आहेत़ जिल्ह्यातील ३०२ सेतू सुविधा केंद्रांपैकी जवळपास शंभरांवर केंद्र बंद आहेत़ तांत्रिक अडचणींमुळे सातबारा मिळत नसल्याने महा-बुलेट वेबसाईटवरून सातबारा काढून त्यावर सही, शिक्का देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी तलाठ्यांना दिल्या होत्या़ त्यातच पीकविमा भरण्याचे सर्व्हर डाऊन झाल्याने अडथळ्यात भर पडली आहे़ तर काही वेळा पीकविमा भरल्यानंतर येणारी पावती कोरी येत आहे़ त्यामुळे पुन्हा पुन्हा माहिती भरून ती पाठवावी लागत आहे़नांदेड जिल्ह्यात यंदा पीकविमा योजना इफ्को टोकीओ जनरल इंन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येत असून जवळपास ८० हजार शेतकºयांनी सोयाबीन, कापूस, उडीद आदी पिकांचा विमा काढला असून त्यापोटी साडेतीन कोटी रूपयांचा भरणा झाला आहे़मागील वर्षात १० लाख ४० हजार ६१७ शेतकºयांनी साडेपाच लाख हेक्टरवरील पिकांचा विमा काढला होता़ यंदा सोयाबीनचे पेरणी क्षेत्र जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे़---कृषी विभागाने केले आवाहनशेतकºयांना विमा अर्ज भरण्यासाठी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात (डिजिटल सेवा केंद्र) जावे लागेल. बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर शेवटच्या दिवशी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीत आॅनलाईन अर्ज भरता येणार नाही. तसे झाल्यास योजनेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी शेवटच्या दिवशी गर्दी करु नये़त्यामुळे शेतकºयांनी पीक पेºयाचे स्वयंघोषणापत्र, सातबारा, ७-अ, आधारकार्ड, बँकेचे पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह विमा हप्ता भरुन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक चलवदे यांनी केले आहे़---अडचणी झाल्या दूरसातबारा मिळण्यासाठी सर्व्हरची अडचण निर्माण झाली होती़ परंतु, ती दूर करण्यात आली असून शेतकºयांना वेळेत सातबारा देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत़ तसेच महा-बुलेटवरून काढण्यात येणाºया सातबारावर सही, शिक्का देण्याच्या सूचनाही तलाठ्यांना दिल्या आहेत़-अरूण डोंगरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी