शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

लॉकडाऊनमुळे गृहिणींनी घरातच उघडले पाककलेचे दालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 2:36 PM

घरातील प्रत्येकाला चविष्ट पदार्थांसह वाचनसंस्कृती, प्राणायमाचे धडे

ठळक मुद्देघरगुती चविष्ट पदार्थांमुळे खवय्यांची चंगळ 

- श्रीनिवास भोसलेनांदेड : लॉकडाऊनमुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, चायनिज सेंटर, पाणीपुरी बंद असल्याने आपल्या घरातील खवय्यांची इच्छा पूर्ण करण्याची संधी गृहिणींना मिळाली आहे़ त्यातूनच मध्यमवर्गीय घरातील गृहिणींच्या पाककलेला चालना मिळत आहे़ रोज नवनवीन पदार्थ बनवणे व त्याचे फोटो स्टेट्सला, सोशल मीडियावर अपलोड करण्याची जणू गृहिणींमध्ये स्पर्धाच लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे़

लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे़ परंतु, घरात बसून पुरूष मंडळी टिव्ही पाहणे, पुस्तक वाचणे आणि फारच कंटाळा आलाच तर बाहेर फेरफटका मारत आहेत़ या काळात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ गृहिणी वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी इंटरनेटचा आणि सोशल मिडियाचा वापर करीत आहेत़ घरातील वा आप्तेष्ट, मित्र, मैत्रिण यांचा वाढदिवस असला की हॉटेलिंग अथवा पाणीपुरी, भेळ, चायनिज पदार्थांची पार्टी ठरलेली असायची़ परंतु, लॉकडाऊनमुळे या सर्वांवर गदा आली आहे़ परंतु, अनेक घरामध्ये मुली-गृहिणींनी घरातच केक बनवून वाढदिवस, अ?ॅनिव्हर्सरी साजरी केल्याचे पहायला मिळत आहे़

लॉकडाऊमुळे घरातील मंडळींना आणि गृहिणींना वेळच वेळ मिळत आहे़ त्याचा सदुपयोग करता यावा म्हणून वाचन, विविध पदार्थ पाहणे, प्राणायम आदी उपक्रम हाती घेत आहेत़ यातूनच वेगवेगवेगळे पारंपरिक पदार्थ घरीच बनविण्याबरोबर बेकरी, हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या प्रत्येक पदाथार्ची रेसिपी युट्युबवर पाहून घरी बनविण्यात अनेक गृहिणी गुंतलेल्या आहेत़ विविध प्रकारचे केक, चाईनिज पदार्थ, रेसिपीज, साऊथ आणि पंजाबी डिशेस बनविण्याचे काम महिला करीत आहेत़ त्यांनी बनविलेल्या पदार्थांचा घरातील लहापासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण अस्वा घेत आहे़  

अभ्यासक्राबरोबरच दिले जाताहेत इतिहासाचे धडेप्रत्येक जण आज आपल्या कुटुंबियासमवेत आहे़ दिवसभर वेळेच वेळ असल्याने करमणुकीबरोबरच मुलांच्या अभ्यासाकडे बहुतांश पालक लक्ष देत आहेत़ त्यांच्या शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यावर भर दिला जात आहे़ करमणुकीसाठी विविध खेळ, वाचन नित्यनियमच झाला आहे़ बऱ्याच घरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ़बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आदी महापुरूषांच्या जीवनकायार्चे धडे दिले जात आहेत़

लॉकडाऊनमध्ये २४ डिश बनविल्याघरातील प्रत्येकाची आवड वेगळी, मग नेहमीच्या जेवनासह नवीन एक पदार्थ बनविण्याचा प्रयत्न केला़ यातून आज २४ विविध डिश बनविल्या़ यात बेकरी, चायनिज, साऊथ आणि अधिक प्रमाणात महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश आहे़ आवडीच्या पदार्थांबरोबर दररोज मुलींचा अभ्यास, नियमित व्यायाम आणि दररोज किमान १५ भाग स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे पाहिले़ यातून आजपर्यंत ७२० भाग पाहणे झाले़ - सुनीता मिरटकर,  शारदानगर

नवीन भाषा अवगत करण्याचा प्रयत्नघरातील सर्वच कामे करून मिळालेल्या वेळेत सोशल मिडिया अथवा इंटरनेटवरील रेसिपी पाहून मी जवळपास १२ नवीन पदार्थ बनवायला शिकले़ तसेच आमचे मुळ गाव देगलूर तालुक्यात असल्याने तेलगू भाषेचा थोडा गोडवा होता़  त्यामुळे तेलगू चित्रपट पाहणे, नवीन शब्द पाठ करून नवीन भाषा अवगत करण्याचा प्रयत्न केला़ - सुमती बासरे, गृहिणी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्नHomeघर