ऑटोचालकाने केली प्रवाशाला मारहाण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:14+5:302021-02-05T06:10:14+5:30

राष्ट्रसंत भगवानबाबा पुण्यतिथी नांदेड : लातूरफाटा येथील राष्ट्रसंत भगवानबाबा चौक येथे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. जय ...

The driver hit the passenger ... | ऑटोचालकाने केली प्रवाशाला मारहाण...

ऑटोचालकाने केली प्रवाशाला मारहाण...

राष्ट्रसंत भगवानबाबा पुण्यतिथी

नांदेड : लातूरफाटा येथील राष्ट्रसंत भगवानबाबा चौक येथे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. जय भगवान संघाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी रमेश सांगळे, गिरीश डिगोळे, प्राचार्य डॉ. विठ्ठल केंद्रे, गुरुनाथराव घुगे, अनुराग शेळके, श्रीनिवास गोरडवार, पप्पू केंद्रे यांची उपस्थिती होती.

न्यायाधीशांच्या नावे घातला गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क

नांदेड : शहरातील नवी आबादी भागातील एका तरुणाला न्यायाधीशांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट काढून मेसेंजरवरून १७ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरील न्यायाधीश हे सध्या सोलापूर येथे आहेत. तर, त्यांचा मित्र नवी आबादी भागात राहतो. या तरुणाने गरज असेल म्हणून त्या खात्यावर १७ हजार रुपये पाठविले होते. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

नांदेड : महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी मारुती कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. राज्य उपाध्यक्ष अशोक शेंडगे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. उपाध्यक्ष म्हणून मयूर कदम, कार्याध्यक्ष- मुस्तफा खान गुलाम गौसखान, सरचिटणीस राजा पटेल अब्दुल मुंतजीब, विठ्ठल चांदणे, परमेश्वर माहुरे, आशा घुले, शेख रहिम आदींची यावेळी निवड करण्यात आली आहे.

Web Title: The driver hit the passenger ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.