गळफास घेऊन चालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:59+5:302021-05-26T04:18:59+5:30
उमरी तालुक्यातील कुदळा येथील मूळ रहिवासी तथा कारचालक राजेंद्र बेरजे (ह. मु. सिडको, नांदेड) यांची पत्नी कोमल बेरजे यांना ...

गळफास घेऊन चालकाची आत्महत्या
उमरी तालुक्यातील कुदळा येथील मूळ रहिवासी तथा कारचालक राजेंद्र बेरजे (ह. मु. सिडको, नांदेड) यांची पत्नी कोमल बेरजे यांना त्यांच्या भावाने गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या माहेरी म्हणजे विष्णुपुरी, नांदेड येथे नेले. पत्नी माहेरी गेल्यापासून कारचालक राजेंद्र बेरजे हे पंकजनगर, धनेगाव येथे वास्तव्यास असलेल्या त्यांचे वडिलांकडे राहत होते.
दरम्यान, राजेंद्र गंगाधरराव बेरजे २४ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या वाजेदरम्यान, सासरवाडी विष्णुपुरी येथे जातो म्हणून गेले व रात्री उशिरापर्यंत 'ते' वडिलांकडे पंकजनगर, धनेगाव येथे परत आले नाहीत. तद्नंतर २५ मे रोजी सकाळी सातपूर्वीच राजेंद्र बेरजे हे विष्णुपुरी, नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील लिंबाच्या झाडाला काळ्या सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले, अशी माहिती ठाणे अंमलदार तथा साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. एन. मोरे खैरकेकर आणि मदतनीस महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी मस्के यांनी दिली.
या प्रकरणी मृत राजेंद्र बेरजे यांचे वडील गंगाधरराव सटवाजीराव बेरजे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय रामदिनेवार हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.