शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

नांदेड जिल्ह्यातील थकबाकीदार पाणीपुरवठा योजनांची होणार वीज खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 12:25 AM

मागील अनेक वर्षांपासून थकित असलेल्या वीजबिलापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित केला जाणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. नांदेड परिमंडळांतर्गत येणा-या पाणीपुरवठा योजनेतील ग्राहकांकडे १४२ कोटी ४३ लाख तर पथदिवे ग्राहकांकडे ३३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकित वीजबिल असलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषद तसेच महानगरपालिकांनी त्यांच्याकडील वीजबिलांचा त्वरित भरणा करुन होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहावितरण : ४१ हजार ग्राहकांकडे १४२ कोटी ४३ लाख थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील अनेक वर्षांपासून थकित असलेल्या वीजबिलापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडील पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित केला जाणार असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.नांदेड परिमंडळांतर्गत येणा-या पाणीपुरवठा योजनेतील ग्राहकांकडे १४२ कोटी ४३ लाख तर पथदिवे ग्राहकांकडे ३३५ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकित वीजबिल असलेल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषद तसेच महानगरपालिकांनी त्यांच्याकडील वीजबिलांचा त्वरित भरणा करुन होणारी कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.महावितरणच्या वतीने वारंवार सूचना देवूनही परिमंडळातील स्थानिक स्वराज्य संस्था थकित वीजबिलांचा भरणा करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील पाणीपुरवठा वीजग्राहकांकडे डिसेंबर २०१७ अखेर १०६ कोटी ७३ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यामध्ये नांदेड शहर विभागातील पाणीपुरवठा वीजग्राहकांकडे ३ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे.तसेच कंधारमध्ये १० कोटी पाच लाख, लोहा तालुक्यात १३ कोटी ७३ लाख, मुदखेडमध्ये ५ कोटी ४० लाख तसेच बिलोलीमधील ग्राहकांकडे ३ कोटी ८२ लाख, देगलूरमध्ये १९ कोटी ९३ लाख, धर्माबाद- ३ कोटी ९४ लाख, मुखेड - १३ कोटी १६ लाख, नायगाव- ६ कोटी ४७ लाख, भोकर -४ कोटी ३१ लाख, हदगाव- ८ कोटी ३७ लाख, हिमायतनगरमध्ये ३ कोटी ३४ लाख, किनवट- ४ कोटी चार लाख, माहूरमधील ग्राहकांकडे ७७ लाख तर उमरी उपविभागातील वीजग्राहकांकडे ३ कोटी ८३ लाख रूपये तर नांदेड जिल्ह्यात पथदिव्यांची १७७ कोटी ४२ लाख रुपयांची थकबाकी आहे.पाणीपुरवठा आणि पथदिवे वीजग्राहकांकडील थकबाकी हा महावितरणसाठी डोकेदुखीचा विषय ठरत असून दिवसेंदिवस ग्राहकांकडील थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढतच चालला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी थकबाकी बिलासह चालू देयकांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.पथदिवे ग्राहकांकडे ३३५ कोटी २९ लाख थकलेनांदेड परिमंडळांतर्गत येणा-या परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील पथदिवे ग्राहकांकडे एकूण ३३५ कोटी २९ लाखांची थकबाकी आहे. तसेच घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वीज ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा लक्षात घेता महावितरणच्या वतीने परिमंडळात विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वारंवार सूचना देवूनही बिलांचा भरणा न करणा-या वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात असून ग्राहकांना वेळेवर बिलांचा भरणा करण्याचे आवाहन केले जात आहे.