नात्याला काळिमा ! बापाने नऊ वर्षीय चिमुकलिवर केला अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 12:18 IST2021-06-16T12:16:43+5:302021-06-16T12:18:43+5:30

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार १५ जूनच्या रात्री तिच्या ९ वर्षीय मुलीचा ओरडण्याचा आवाज आला तेव्हा घटनेचा उलगडा झाला.

Disgrace the relationship! The father raped his nine-year-old girl | नात्याला काळिमा ! बापाने नऊ वर्षीय चिमुकलिवर केला अत्याचार

नात्याला काळिमा ! बापाने नऊ वर्षीय चिमुकलिवर केला अत्याचार

ठळक मुद्देबालिका माझी नाही असे सांगत त्याने पत्नीला पण मारहाण केली.आईने आपल्या मुलींना सोबत घेऊन माहेर गाठले.

नांदेड (प्रतिनिधी)- आपल्याच ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून एका जन्मदात्याने नात्याला काळिमा फासला आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या नराधम बापाला गजाआड केले आहे.

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार १५ जूनच्या मध्यरात्री नंतर ३ वाजेच्या सुमारास घडला आहे. १६ जूनच्या रात्री १ वाजता नांदेड ग्रामीण पोलिसांनी या आरोपी बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका आईने दिलेल्या तक्रारीनुसार १५ जूनच्या रात्री तिच्या ९ वर्षीय मुलीचा ओरडण्याचा आवाज आल्याने तिने घरात जाऊन पहिले असतांना बालिकेने सांगितले की,तिच्या बापानेच तिच्या सोबत लैगिक अत्याचार केला आहे. आईने आपल्या पतीला याबाबत विचारणा केली तेव्हा हि बालिका माझी नाही असे सांगत त्याने पत्नीला पण मारहाण केली. सायंकाळी आईने आपल्या मुलींना सोबत घेऊन माहेर गाठले. तिला एकूण चार मुली आहेत. एकीचे लग्न झालेले आहे. सर्वात लहान बालिका ९ वर्षांची आहे. तिच्यावरच बापाने लैगिक अत्याचार केला आहे.

घाबरलेली आई अगोदर वजिराबाद पोलीस ठाण्यात गेली होती. वजिराबाद पोलिसांनी सर्व माहिती जाणून घेतल्यावर घटना घडली ती जागा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांना नांदेड ग्रामीणचे पोलीस बोलावून तिकडे पाठवले. नांदेड ग्रामीण ठाण्यात  बापाविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उप निरीक्षक गणेश होळकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपी बापाला गजाआड केले आहे.

Web Title: Disgrace the relationship! The father raped his nine-year-old girl