शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

नवीन गणवेशाबाबत महिला वाहकांमध्ये असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 00:42 IST

राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा विदूषकी गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना उपहास, चेष्टेला सामोरे जावे लागत आहे. दिलेले गणवेश हे योग्य मापाचे नसल्यामुळे तंग पॅन्ट, ढगळे कुडते अडकवून महिला वाहकांना बुजगावण्यासारखे वावरावे लागत आहे.

नांदेड : राज्य परिवहन सेवेत खाकी गणवेश धारण करून तिकीटवाटपाची कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना आता नवीन गणवेशाचे वाटप प्रशासनामार्फत करण्यात येत आहे़ हा नवीन गणवेश शाळकरी मुलींसारखा असून ग्रामीण भागात असा विदूषकी गणवेश घालून वाहकाची कामगिरी करताना उपहास, चेष्टेला सामोरे जावे लागत आहे. दिलेले गणवेश हे योग्य मापाचे नसल्यामुळे तंग पॅन्ट, ढगळे कुडते अडकवून महिला वाहकांना बुजगावण्यासारखे वावरावे लागत आहे.सदरच्या विदूषकटाईप गणवेशाबद्दल महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा गणवेश ठरविताना काही मोजक्याच प्रतिनिधींना बोलावून संमती घेण्यात आली होती .परंतु प्रत्यक्षात हा गणवेश धारण केल्यानंतर अनेक असुविधा निर्माण होत असल्याची भावना महिला वाहक व्यक्त करीत आहेत. पूर्वी महिला वाहकांना पोलिसांप्रमाणे खाकीचा गणवेश होता.या खाकी गणवेशामुळे महिला वाहकांना आदर, सन्मान मिळत होता. खाकी गणवेश धारण करून कामगिरी करणाऱ्या महिला वाहकांना सुरक्षित व संरक्षित वाटत होते. जनसामान्यांत खाकी गणवेश याबद्दल निर्माण असलेला आदर या महिला भगिनींना प्राप्त होत होता. परंतु आता नवीन देण्यात आलेल्या गणवेशाची प्रतवारी त्याचा रंग व ग्रामीण भागात असा पेहराव हा आत्मसन्मानाला बाधा निर्माण करणारा झाला आहे.या नवीन गणवेशाबाबत महिला वाहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नांदेड विभागातील महिला वाहकांनी नवीन गणवेशाऐवजी पूर्वीचा खाकीचाच गणवेश घ्यावा, असे विनंती अर्ज माननीय उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,राज्य परिवहन महामंडळ यांना केले आहेत.जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने परिवहनमंत्री तथा अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ दिवाकर रावते यांना महिला वाहकांना खाकी गणवेश पूर्ववत देण्यात यावा, बसस्थानकात, आगारात सॅनेटरी व्हेंडिग मशीन बसविण्यात याव्यात व महिला कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन महिला कामगारांनी स्वाक्षरीनिशी दिलेले आहे .प्रत्येक विभागात जागतिक महिला दिन साजरा करताना महिला गणवेशाच्या बाबतीत महिला कामगार यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे व हा गणवेश न देता खाकी गणवेश पूर्ववत देण्यात यावा, अशी जोरदार मागणी सर्व महिला कामगारांनी केली आहे.

टॅग्स :Nandedनांदेडstate transportराज्य परीवहन महामंडळWomenमहिला