दिग्विजय करणार गुरुत्वाकर्षण लहरींवर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:34+5:302021-09-19T04:19:34+5:30

येथील डॉ. गायत्री वाडेकर व डॉ. शिवाजी वाडेकर यांचा सुपुत्र दिग्विजय वाडेकर याची न्यूयार्कमधील अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या प्रिन्सटन ...

Digvijay will do research on gravitational waves | दिग्विजय करणार गुरुत्वाकर्षण लहरींवर संशोधन

दिग्विजय करणार गुरुत्वाकर्षण लहरींवर संशोधन

Next

येथील डॉ. गायत्री वाडेकर व डॉ. शिवाजी वाडेकर यांचा सुपुत्र दिग्विजय वाडेकर याची न्यूयार्कमधील अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या प्रिन्सटन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीजमध्ये पोस्ट डॉक्टरल रिसर्च साइंटिस्ट म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रिन्सटन विद्यापीठ हे जगातील सर्व विद्यापीठांमध्ये गुणवत्तेच्या दर्जानुसार तिसऱ्या क्रमांकावर असून, महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी १९३५ मध्ये या विद्यापीठाची स्थापना केली होती.

दिग्विजय याने नुकतीच न्यूयॉर्क विद्यापीठातून पीएच.डी.ची पदवी प्राप्त केली असून, त्याने ‘कॉस्मॉलॉजी विथ नॉव्हेल ॲनालिटिक्स अँड मशीन लर्निंग टेक्निक’ या विषयावर संशोधन पूर्ण केले आहे. त्याच्या या संशोधनाची दखल घेऊन त्याला संशोधक शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

दिग्विजय लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आणि संशोधकवृत्तीचा होता. ॲस्ट्रॉनॉमी ऑलम्पियाडमध्ये देशात पहिल्या ३३ मध्ये निवड, आय.आय.टी. पवई येथे बीटेकची पदवी पूर्ण करण्यापूर्वीच त्याला न्यूयॉर्क विद्यापीठाच्या मॅकक्रॅकन फेलोशिप या संपूर्ण फंड स्कॉलरशिपसह एम.एस. व पीएच.डी. (फिजिक्स स्पेशालिटी इन ॲट्रोफिजिक्स) मध्ये प्रवेश मिळाला. आता पीएच.डी. नंतर लगेच प्रिन्सटन युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट डॉक्टरल रिसर्च सायंटिस्ट म्हणून त्याची निवड झाली आहे.

चौकट...

आपल्याला म्हणजे मानवाला आजपर्यंत केवळ ५ टक्के विश्वाची माहिती आहे. उर्वरित विश्व दोन रहस्यमय घटकांपासून बनलेले आहे. ज्याला ‘डार्क मॅटर’ आणि ‘डार्क एनर्जी’ असे म्हणतात. ही रहस्ये सोडविण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी जगभरातील दुर्बिणींमधून आकाशगंगांचे निरीक्षण करतो. आजपर्यंत मी माझ्या संशोधनाआधारे काल्पनिक विश्लेषणात्मक आणि मशीन लर्निंग पद्धती विकसित केल्या आहेत. ज्या पूर्वी वापरल्या गेलेल्या तंत्रांपेक्षा लक्षणीय वेगवान आहेत आणि ब्रह्मांडाची रचना, उत्क्रांती आणि अंतिम भविष्य समजून घेण्यासाठी दुर्बिणीच्या निरीक्षणाचा वापर करण्यास आम्हाला मदत करतात. विश्वाच्या मुलभूत बिल्डिंग ब्लॉक्सचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. कारण, पूर्वी, यातूनच संगणक, लेसर, जीपीएस, एमआरआय आणि इतर अनेक तंत्रज्ञानाचा विकास झाला.

- दिग्विजय वाडेकर, संशोधक शास्त्रज्ञ

Web Title: Digvijay will do research on gravitational waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.