शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादचे भाविक गोदावरीत बोटीतून गेले अन् ऐन मध्यात पोहण्यास उतरले, ५ जणांना जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 16:32 IST

गोदापात्र धोकादायक असून, येथे पोहण्यास मनाई आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरतात.

धर्माबाद (जि. नांदेड) : धर्माबादपासूनजवळच असलेल्या तेलंगणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बासर येथे दर्शनासाठी आलेल्या पाच भाविकांचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. ही घटना १५ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे.

तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या चिंतल बाजार येथील १८ भाविक बासर येथे श्री सरस्वती मातेचे दर्शन घेऊन गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने राकेश (वय १७), विनोद (वय १८), मदन (वय १८), ऋतिक (वय १७) व भरत (वय १८) या पाच भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अविनाश कुमार, सर्कल इन्स्पेक्टर किरण रेड्डी, पोलिस अधिकारी गणेश, जी. गंगासागर आदींनी घटनास्थळी भेट देत स्थानिक मच्छीमाराच्या साह्याने मदतकार्य सुरू केले. बुडालेल्या चौघांचे मृतदेह सापडले परंतु पाचवा युवक भरत काही सापडत नव्हता. तब्बल तास ते दीड तास शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह हाती लागला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

निष्काळजीपणा जीवावर बेतलाहैदराबाद येथील १८ भाविक वाहनाने बासर येथे दर्शनासाठी रविवारी सकाळी दाखल झाले होते. दरम्यान, गंगास्नान करण्यासाठी ते गोदातटावर आले. बोटमध्ये बसून ते सर्वजण नदीपात्रात गेले. मध्यभागी गेल्यावर पाच ते सहा जणांनी पोहण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पाचजणांना जलसमाधी मिळाली. गोदापात्र धोकादायक असून, येथे पोहण्यास मनाई आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत अनेकजण पोहण्यासाठी नदीपात्रात उतरतात. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी बोटचालकांना तंबी दिली होती. त्याउपरही आजची घटना घडली असून या भाविकांना घेऊन गेलेल्या बोटचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdrowningपाण्यात बुडणेgodavariगोदावरी