रस्ते कंत्राटदाराकडे खंडणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:22 IST2021-08-12T04:22:50+5:302021-08-12T04:22:50+5:30

तिन्ही मुलीच झाल्याने केला छळ तिन्ही मुलीच झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी पीडित विवाहितेचा छळ केला. तसेच गाडी घेण्यासाठी माहेराहून एक ...

Demand for ransom from the road contractor | रस्ते कंत्राटदाराकडे खंडणीची मागणी

रस्ते कंत्राटदाराकडे खंडणीची मागणी

तिन्ही मुलीच झाल्याने केला छळ

तिन्ही मुलीच झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी पीडित विवाहितेचा छळ केला. तसेच गाडी घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. ही घटना मावळ जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे घडली. या प्रकरणात पीडितेने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

गुप्ती घेऊन फिरणारा अटकेत

शहरातील नगीनाघाट भागात असलेल्या गुुरुद्वारा परिसरात बेकायदेशीररित्या गुप्ती घेऊन फिरत असलेल्या आरोपीला वजिराबादच्या डीबी पथकाने पकडले. त्याच्याकडून ते शस्त्र जप्त करण्यात आले. या प्रकरणात पोहेकॉ. दत्तराम जाधव यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

मरखेल येथे चार ठिकाणी धाडी

मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी जुगार अड्डयावर धाडी मारण्यात आल्या. बसस्थानक परिसरातून १३ हजार, मार्केट यार्ड १ हजार ३०० आणि १ हजार ६००, तर अन्य एका ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावरून दीड हजार रुपये जप्त करण्यात आले.

सहा हजार रुपयांची देशी दारु पकडली

निवघा ते हदगांव जात असलेल्या रस्त्यावरून दुचाकीवर दारु घेऊन जात असताना आरोपीला पाेलिसांनी पकडले. त्याच्याकडून सहा हजार रुपयांची देशी दारु आणि दुचाकी जप्त करण्यात आली. या प्रकरणात हदगांव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: Demand for ransom from the road contractor