शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या सलग्न महाविद्यालयांत जुन्याच पद्धतीने पदवीचा अभ्यासक्रम

By प्रसाद आर्वीकर | Updated: June 17, 2023 15:58 IST

विद्यापीठ परिसर आणि स्वायत्त महाविद्यालयात या वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरण लागू

नांदेड : नवीन शैक्षणिक धोरण की जुनेच, असा महाविद्यालयांसमोर निर्माण झालेला पेच आता मिटला आहे. शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १६ जून रोजी विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणेच पदवीचे प्रथम वर्षाचे प्रवेश दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र विद्यापीठ परिसर आणि स्वायत्त महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे.

राज्यात २०२३-२४ पासून नवीन शैक्षणिक धोरण-२०२० लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यासाठी नवीन अभ्यासक्रमदेखील तयार केला होता. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी समोर येत आहेत. त्यामुळे या धोरणाची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून करु नये, अशी मागणी केली जात होती. याच अनुषंगाने ९ जून रोजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतखाली सुकाणू समिती आणि सर्व अकृषीक विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सुकाणू समितीने काही सुधारित शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार शासनाच्या उच्च तंत्र व शिक्षण मंत्रालयाने आदेश काढले असून, विद्यापीठांशी सलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये २०२४-२५ पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे सलग्न असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये यावर्षीचे पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश जुन्या अभ्यासक्रमानुसारच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्वायत्त महाविद्यालयात नवे धोरणविद्यापीठ परिसरातील आणि स्वायत्त महाविद्यालयात मात्र २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासूनच नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवीचे प्रवेश होणार आहेत. नवीन धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणेच स्वायत्त महाविद्यालयांत पदवीचे शिक्षण दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

पदव्युत्तरसाठी अंमलबजावणी सुरुपदव्यु्त्तर अभ्यासक्रमासाठी मात्र राज्यात सर्वत्र नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करण्याची तयारी करावी लागणार आहे.

शासनाच्या निर्णयाचे स्वागतउच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांसोबत कुलगुरुंच्या झालेल्या बैठकीत शिक्षण धोरणाची अंमलबजावणी महाविद्यालयांमध्ये पुढील वर्षापासून करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णयातील त्रुटी दूर करणे, विशेषत: विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य आणि कार्यभारावर प्रतिकुल परिणार होणार नाही, या दृष्टीने सुधारणा करणे गरजेचे आहे. तुर्तास शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत.- प्रा.डॉ.डी.एन. मोरे, विद्या परिषद सदस्य, स्वारातीम, नांदेड.

टॅग्स :Nandedनांदेडswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडEducationशिक्षण