शहरं
Join us  
Trending Stories
1
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
2
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
3
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
4
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
5
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
6
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
7
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
8
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
9
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
10
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
11
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
12
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत
13
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
14
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
15
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
16
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
17
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
18
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
19
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
20
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर

Deglur bypoll : अर्ध्या फेऱ्या संपल्या ! कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांकडे १५ व्या फेरी अखेर १९१८० मतांची मोठी आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2021 1:08 PM

Deglur bypoll: भाजपाने या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होईल असा दावा केला होता. तर पंढरपूर सारखी लॉटरी एखाद्यावेळीच लागते अस प्रत्युत्तर काँग्रेसने दिले होते.

नांदेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून लढणारे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर हे पहिल्या फेरीपासूनच आघाडी टिकवून आहे. एकूण ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून १५ व्या फेरीअखेर अंतापूरकर यांना १९१८० मतांची आघाडी मिळाली आहे. जितेश अंतापूरकर यांना ५६४०९ मते तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ३७२२९ मते मिळाली आहेत. 

आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण १४ टेबलवर ही मोजणी ३० फेऱ्याची होईल. या निवडणुकीत ६४.९५ %   इतकं मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवारी मिळवली. दोन तुल्यबळ उमेदवार मैदानात असताना वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. उत्तम इंगोले यांच्या माध्यमातून तगडे आव्हान दिले. भाजपाने या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होईल असा दावा केला होता. तर पंढरपूर सारखी लॉटरी एखाद्यावेळीच लागते अस प्रत्युत्तर काँग्रेसने दिले होते.

देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी: पंधरावी फेरीकॉंग्रेस - जितेश रावसाहेब अंतापूरकर - ५६४०९

भाजप - सुभाष पिराजीराव साबणे - ३७२२९ 

वंचित- डॉ. उत्तम रामराव इंगोले - ५७९४ 

पंधराव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ३८१०भाजप - सुभाष साबणे - २३७२वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ३७० कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १४३८ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १९१८० मतांनी आघाडीवर आहेत.

चौदाव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ४०६९भाजप - सुभाष साबणे - २५६५वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ३६५कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १५०५ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १७७४२ मतांनी आघाडीवर आहेत.

तेराव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ४१८६भाजप - सुभाष साबणे - २१२३वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ५९५कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना २०६३ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १६२३८ मतांनी आघाडीवर आहेत.

बाराव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ३८२१ भाजप - सुभाष साबणे - २२२६वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ४४७कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १५९५ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १४१७५ मतांनी आघाडीवर आहेत.

अकराव्या फेरीतील मते :कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ३९३१ भाजप - सुभाष साबणे - २३२० वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ४८७कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १६११ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १२५८० मतांनी आघाडीवर आहेत.

टॅग्स :deglur-acदेगलूरNandedनांदेडcongressकाँग्रेसBJPभाजपा