Deglur bypoll : अर्ध्या फेऱ्या संपल्या ! कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांकडे १५ व्या फेरी अखेर १९१८० मतांची मोठी आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 01:08 PM2021-11-02T13:08:52+5:302021-11-02T13:10:02+5:30

Deglur bypoll: भाजपाने या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होईल असा दावा केला होता. तर पंढरपूर सारखी लॉटरी एखाद्यावेळीच लागते अस प्रत्युत्तर काँग्रेसने दिले होते.

Deglur bypoll: Half rounds over! Congress' Jitesh Antapurkar has a big lead of 19,180 votes in the 15th round | Deglur bypoll : अर्ध्या फेऱ्या संपल्या ! कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांकडे १५ व्या फेरी अखेर १९१८० मतांची मोठी आघाडी

Deglur bypoll : अर्ध्या फेऱ्या संपल्या ! कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकरांकडे १५ व्या फेरी अखेर १९१८० मतांची मोठी आघाडी

Next

नांदेड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून लढणारे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर हे पहिल्या फेरीपासूनच आघाडी टिकवून आहे. एकूण ३० फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून १५ व्या फेरीअखेर अंतापूरकर यांना १९१८० मतांची आघाडी मिळाली आहे. जितेश अंतापूरकर यांना ५६४०९ मते तर भाजपच्या सुभाष साबणे यांना ३७२२९ मते मिळाली आहेत. 

आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण १४ टेबलवर ही मोजणी ३० फेऱ्याची होईल. या निवडणुकीत ६४.९५ %   इतकं मतदान झाले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवारी मिळवली. दोन तुल्यबळ उमेदवार मैदानात असताना वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. उत्तम इंगोले यांच्या माध्यमातून तगडे आव्हान दिले. भाजपाने या निवडणुकीत पंढरपूरची पुनरावृत्ती होईल असा दावा केला होता. तर पंढरपूर सारखी लॉटरी एखाद्यावेळीच लागते अस प्रत्युत्तर काँग्रेसने दिले होते.

देगलूर पोटनिवडणूक मतमोजणी: पंधरावी फेरी
कॉंग्रेस - जितेश रावसाहेब अंतापूरकर - ५६४०९

भाजप - सुभाष पिराजीराव साबणे - ३७२२९ 

वंचित- डॉ. उत्तम रामराव इंगोले - ५७९४ 

पंधराव्या फेरीतील मते :
कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ३८१०
भाजप - सुभाष साबणे - २३७२
वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ३७० 
कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १४३८ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १९१८० मतांनी आघाडीवर आहेत.

चौदाव्या फेरीतील मते :
कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ४०६९
भाजप - सुभाष साबणे - २५६५
वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ३६५
कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १५०५ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १७७४२ मतांनी आघाडीवर आहेत.

तेराव्या फेरीतील मते :
कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ४१८६
भाजप - सुभाष साबणे - २१२३
वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ५९५
कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना २०६३ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १६२३८ मतांनी आघाडीवर आहेत.

बाराव्या फेरीतील मते :
कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ३८२१ 
भाजप - सुभाष साबणे - २२२६
वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ४४७
कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १५९५ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १४१७५ मतांनी आघाडीवर आहेत.

अकराव्या फेरीतील मते :
कॉंग्रेस - जितेश अंतापूरकर - ३९३१ 
भाजप - सुभाष साबणे - २३२० 
वंचित - डॉ. उत्तम इंगोले - ४८७
कॉंग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना १६११ चे मताधिक्य. अंतापूरकर एकूण १२५८० मतांनी आघाडीवर आहेत.

Web Title: Deglur bypoll: Half rounds over! Congress' Jitesh Antapurkar has a big lead of 19,180 votes in the 15th round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.