शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

देगलूर- बिलोली पोटनिवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या; तुल्यबळ लढतीत कोण मारणार बाजी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 18:42 IST

Deglaur- Biloli by-election: मतदानाला आता दोन दिवस शिल्लक असून, मतदारांच्या गुपचूप भेटी- गाठी घेण्यात येत आहेत.

देगलूर (जि. नांदेड) : देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी सात वाजता थंडावल्या. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून, मतदारांचा कौल २ नाेव्हेंबर रोजी कळणार आहे. 

देगलूर- बिलोली मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांच्या उमदेवारांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात हजेरी लावली. मतदानाला आता दोन दिवस शिल्लक असून, मतदारांच्या गुपचूप भेटी- गाठी घेण्यात येत आहेत. आचारसंहिता भंग होणार नाही, यासाठी सर्वच उमेदवार खबरदारी घेत आहेत.

कॉंग्रेस-भाजप-वंचित तुल्यबळ लढाई२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होऊन उमेदवारी मिळवली. दोन तुल्यबळ उमेदवार मैदानात असताना वंचित बहुजन आघाडीनेही डॉ. उत्तम इंगोले यांच्या माध्यमातून तगडे आव्हान मतदारसंघात उभे केले आहे.

एकूण ४१२ मतदार केंद्रया मतदारसंघात एकूण ४१२ मतदार केंद्र स्थापन केले असून, यातील ८ केंद्र संवेदनशील आहेत. सर्व केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले असून, १ हजार ६४८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. तर ८२४ कर्मचारी राखीव आहेत.

टॅग्स :deglur-acदेगलूरNandedनांदेडElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा