शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

बोंडअळीमुळे कापूस उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:29 IST

कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ त्यातच शासनाचा हमीभाव गतवर्षीपेक्षा १४०० रूपयांनी कमी आहे़ त्यामुळे बळीराजा दोन्हींकडून अडचणीत सापडला आहे़

ठळक मुद्देबळीराजा संकटात : भाव कमी असल्याने पणन महासंघाकडे शेतक-यांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ त्यातच शासनाचा हमीभाव गतवर्षीपेक्षा १४०० रूपयांनी कमी आहे़ त्यामुळे बळीराजा दोन्हींकडून अडचणीत सापडला आहे़ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या केंद्रावरील कापूस खरेदी निरंक आहे तर सीसीआयच्या केंद्रावर ५ टक्केदेखील खरेदी नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़नांदेडसह हिंगोली, परभणी आणि यवतमाळ जिल्ह्यांतील बहुतांश शेतकरी आपले पांढरे सोने नांदेड जिल्ह्यात येणाºया परराज्यातील व्यापाºयांना विकतात़, परंतु यंदा चित्र बदलल्याचे पहायला मिळत आहे़ नांदेडसह मराठवाड्यातील कापसावर बोंडअळी (गुलाबीअळी)चा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे़ कापसाचे बोंड पूर्णपणे आतील बाजूने खाऊन टाकणाºया या बोंडअळीचा प्रादुर्भाव बीटी बियाणांनी रोखता येतो, असा दावा करणाºया औषध कंपन्या आणि कपाशी बियाणे कंपन्यांचे सर्वच दावे यंदा फोल ठरले आहेत़ जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात सव्वालाख हेक्टरची घट झाली असून यंदा जवळपास सव्वादोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे़ परंतु, उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांनी घटले आहे़ नांदेड, हिंगोली तसेच तेलंगणा राज्यात मध्य प्रदेश आणि गुजरात येथील व्यापाºयांच्या जिनिंग फॅक्ट्री आहेत़ तसेच परराज्यातील व्यापारीदेखील गावागावांत जाऊन खरेदी करीत आहेत़ शासनाने मागील वर्षात कापसाला प्रतिक्विंटल ५७०० रूपये भाव दिला होता़ तर ४३२० रूपये प्रतिक्विंटल भाव आहे़ जवळपास १४ रूपये प्रतिक्विंटलमागे यंदा भाव कमी जाहीर केला़ त्यामुळे व्यापारीदेखील ४४०० ते ४६०० रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे कापसाची खरेदी करीत आहेत़ विरोधी पक्षासह शेतकरी संघटनांनी कापसाला वाढीव भाव देण्याची मागणी केली आहे़ यासाठी आंदोलने, मोर्चे काढले़ त्यामुळे हिवाळी अधिवेशनात सरकारकडून कापसाचा वाढीव हमीभाव दिला जाईल, अशी अपेक्षा आहे़त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कापूस घरातच ठेवल्याचे शेतकरी कदम यांनी सांगितले़ तर कापूस घेवून येईपर्यंत ४५०० रूपये भाव देण्याचे आश्वासन देवून व्यापारी कापूस चांगल्या प्रतीचा नसल्याचे सांगून ४३०० रूपयेच भाव देऊन शेतकºयांची लूट केली जात आहे़