तेलंगणा सीमेवरील येसगी जि.प.शाळा बंदचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:31 AM2018-11-23T01:31:03+5:302018-11-23T01:31:50+5:30

प्रथम सत्रानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने व चार किलोमीटरच्या आत कोणतीच जिल्हापरिषद शाळा नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

Decision on the closure of the ZP School on Telangana border | तेलंगणा सीमेवरील येसगी जि.प.शाळा बंदचा निर्णय

तेलंगणा सीमेवरील येसगी जि.प.शाळा बंदचा निर्णय

Next
ठळक मुद्देआंदोलनाचा इशारापँथर सेनेचा निर्णयाला तीव्र विरोध

सगरोळी : बिलोली तालुक्यातील तेलंगणा सीमेवर असणाऱ्या येसगी (जुने) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला. प्रथम सत्रानंतर हा निर्णय घेण्यात आल्याने व चार किलोमीटरच्या आत कोणतीच जिल्हापरिषद शाळा नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
पुणे शिक्षण संचालकांनी घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, कारण ६ ते १४ वर्षापर्यंत मिळणाºया मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात अनण्याऐवजी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा निर्णय घटनाविरोधी असल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हाशिक्षण अधिकारी नांदेड यांच्यामार्फत पुणे शिक्षण संचालकांना इंडियन पँथर सेना प्रमुख संविधान दुगाने यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याच्या नांदेड - निझामाबाद या दोन जिल्ह्याच्या व बिलोली - बोधन या दोन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या येसगी (जुने) अगदी शेवटचे गाव असून त्यापलीकडे फक्त तीन किलोमीटर अंतरावर तेलंगणा राज्य सुरू होते.या गावाजवळून मांजरा नदी वाहत असल्याने पुराचा धोका ओळखून सन १९८३ साली गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते.अनेक कुटुंबांनी तेथेच राहण्याचा निर्णय घेतल्याने अर्धेच गाव तेथे राहिले याठिकाणी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा असून गत वर्षी १५ विद्यार्थी व तीन शिक्षक कार्यरत होते. तरीही शाळा सुरु होती. त्या मानाने या वर्षी दोन शिक्षक व २४ विद्यार्थी संख्या असताना शाळा बंद करण्यात आली.
इंडियन पँथर सेनेचा निर्णयाला तीव्र विरोध
विद्यार्थ्यांची पुरेशी पट संख्या नाही, असे वाटत असल्यास गत वषीर्ची विद्यार्थी संख्या पडताळणी करावी किंवा पटसंख्या वाढविण्यासठी विविध प्रकारचे उपक्रम राबवा मात्र शाळा बंद करून तेथील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना व पालकांना वेठीस धरून मराठी शाळा बंद करून सक्तीच्या व मोफत शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवत असाल तर तीव्र आंदोलनाचा इशारा इंडियन पँथर सेनाचे संविधान दुगाने, धम्मपाल गावंडे व ग्रामस्थ व समाजिक संघटनेनं दिला
आंदोलनाचा इशारा
परिसरातील पालकांचा कल इंग्रजी शाळेकडे वळल्याने विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले असेलही पण शाळाबाह्य व अर्धवट शिक्षण घेऊन गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी विविध उपाय योजना आखण्याऐवजी शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.एकीकडे तेलंगणा राज्यात जाण्याच्या हालचालीने वेग धरले असता तेलंगणा सीमेवरील शाळा बंद पाडल्याने तेलंगणात जाण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या मुख संमती तरी दर्शविली नसावी हा संभ्रम पालकांमध्ये निर्माण झाला आहे. विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी प्रामुख्याने गरीब कष्टकरी शेतमजुरांची आहेत जे धनदांडगे लोक आहेत त्यांची पाल्य अमाप फिस भरून इंग्रजी शाळेत शिक्षण घेतात पण ज्या पालकांची आर्थिक कुवत नाही अशा पालकांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावे का नाही?असा प्रश्न निवेदनात करण्यात आला.

Web Title: Decision on the closure of the ZP School on Telangana border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.