एकतर्फी प्रेमातून तरुणीवर खंजीरने प्राणघातक हल्ला; एकाविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST2021-04-04T04:18:35+5:302021-04-04T04:18:35+5:30

नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील बळीरामपूर येथील एक २० वर्षीय तरुणी व तिची एक मैत्रीण सिध्दार्थ ऊर्फ ‘जडम’ जमदाडे यांच्यासोबत ...

A dagger attack on a young woman out of one-sided love; Crime against one | एकतर्फी प्रेमातून तरुणीवर खंजीरने प्राणघातक हल्ला; एकाविरुध्द गुन्हा

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर खंजीरने प्राणघातक हल्ला; एकाविरुध्द गुन्हा

नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील बळीरामपूर येथील एक २० वर्षीय तरुणी व तिची एक मैत्रीण सिध्दार्थ ऊर्फ ‘जडम’ जमदाडे यांच्यासोबत ३१ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेचेदरम्यान, साठेनगर, बळीरामपूर येथील जमदाडे यांच्या बंद पडीत घरी वाढदिवस साजरा करीत होते. त्याच वेळी, तेथे अचानक हातात खंजीर घेऊन आलेल्या आरोपी तरुण प्रकाश क्षीरसागर यास पाहताच पीडित तरुणीची मैत्रीण तेथून पळून गेली. दरम्यान, आरोपी प्रकाश क्षीरसागर याने मी मागील एक वर्षापासून तुझ्यावर प्रेम करतो, तू माझ्यावर का प्रेम करत नाहीस, तू मला का बोलत नाहीस, असे म्हणून त्याच्या हातातील खंजीरने पीडित मुलीच्या चेहऱ्यावर, छातीवर, मानेवर, हाता-पायावर व पाठीत गंभीर वार केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा सिध्दार्थ जमदाडे हा अपंग असल्याने घसरत-घसरत येऊन पीडित तरुणीस वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचवेळी आरोपी प्रकाश याने त्याच्या उजव्या हातावर खंजीरने वार केला, असा उल्लेखही पीडित तरुणीच्या आईने नांदेड ग्रामीण ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विश्वजित कासले व पो.कॉ. शंकर बिरमवार हे करीत आहेत.

Web Title: A dagger attack on a young woman out of one-sided love; Crime against one