किरकोळ कारणावरून खंजरने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:08 IST2021-08-02T04:08:07+5:302021-08-02T04:08:07+5:30

आखाड्यावरील वायर केले लंपास तालुक्यातील मौजे निळा येथे आखाड्यावर ठेवलेले पीव्हीसी पाइप, वायरचे बंडल, असे एकूण ४० हजार रुपये ...

Dagger attack for petty reasons | किरकोळ कारणावरून खंजरने हल्ला

किरकोळ कारणावरून खंजरने हल्ला

आखाड्यावरील वायर केले लंपास

तालुक्यातील मौजे निळा येथे आखाड्यावर ठेवलेले पीव्हीसी पाइप, वायरचे बंडल, असे एकूण ४० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबविले. ही घटना १९ जुलै रोजी घडली. या प्रकरणात प्रा. संतोष नागोराव कोकाटे यांनी लिंबगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

झोपलेल्या महिलेचे दागिने चोरीला

नायगाव तालुक्यातील मौजे टाकळी येथे अंगणात झोपलेल्या एका महिलेच्या गळ्यातील साडेसात हजार रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले. बालाजी म्हैसाजी गंधकवाड यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्यावरून नायगाव ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

मजुराला उधारीसाठी केली मारहाण

उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका मजुराला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बिलोली तालुक्यातील थडी येथे घडली. या प्रकरणात धर्मा नागोराव अंकेश्वर यांच्या तक्रारीवरून बिलोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

सात लाखांसाठी विवाहितेचा छळ

जेसीबी घेण्यासाठी माहेरहून सात लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना बिलोली तालुक्यातील बामणी येथे घडली. पीडितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. पीडितेने या प्रकरणात बिलोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Dagger attack for petty reasons