नांदेडमध्ये दादा, मामा, भाऊवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:50 IST2018-07-01T00:50:09+5:302018-07-01T00:50:42+5:30
शहरात विनाक्रमांकाच्या फॅन्सी नंबरप्लेट लावून धूमस्टाईल दुचाकी पळविणाऱ्या दादा, मामा, भाऊवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे़ त्याचबरोबर फटाका आवाज करणा-या ११ बुलेटही जप्त करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे धूमस्टाईल दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत़

नांदेडमध्ये दादा, मामा, भाऊवर कारवाईचा बडगा
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरात विनाक्रमांकाच्या फॅन्सी नंबरप्लेट लावून धूमस्टाईल दुचाकी पळविणाऱ्या दादा, मामा, भाऊवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे़ त्याचबरोबर फटाका आवाज करणा-या ११ बुलेटही जप्त करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे धूमस्टाईल दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले आहेत़
तरुणाईमध्ये सध्या बुलेटची फॅशन आहे़ कंपनीने लावलेले सायलेन्सर काढून किंवा त्यामध्ये छेडछाड करुन फटाका आवाज करणारे सायलेन्सर अनेकांनी आपल्या बुलेट गाड्यांना बसविले आहे़ त्यामुळे रस्त्यावर जाताना या गाड्यांचा मोठा आवाज होता़े या आवाजाचा इतर वाहनधारकांना त्रास होतो़ त्याचबरोबर अनेक दुचाकी विनाक्रमांकाच्याच रस्त्यावरुन धावत आहेत़ दादा, मामा, भाऊ, साहेब असे लिहिलेल्या फॅन्सी नंबरप्लेटनेही धुमाकूळ घातला आहे़ अशा बेशिस्त वाहनधारकांना वठणीवर आणण्यासाठी शहर वाहतूक शाखेने मोहीम सुरु केली आहे़ दररोज जवळपास दीडशे ते दोनशे दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या ११ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत़ नो पार्कींगमध्ये लावण्यात येणाºया वाहनांमुळे कोंडी होत असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे़ खाजगी वाहतूक करणारे किंवा विनापरवाना रिक्षाही बंद करण्याचा इशारा पोनि़ चंद्रशेखर कदम यांनी दिला आहे़ वाहतुकीच्या समस्येसाठी ९७६७८६६६८४ या क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवर माहिती द्यावी़
---
रिक्षाचालकांमध्ये जनजागृती
शहरात १ जुलैपासून रिक्षाचालकांना गणवेशसक्ती करण्यात आली होती़ याबाबत वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी चौकांमध्ये रिक्षाचालकांमध्ये याबाबत जनजागृती केली़ त्यानंतर विविध रिक्षा संघटनांच्या विनंतीवरुन रिक्षाचालकाच्या गणवेशासाठी ५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़