शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

धक्कादायक! १४ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन

By प्रसाद आर्वीकर | Updated: July 28, 2023 15:43 IST

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

- बालाजी नागसाखरेमाळाकोळी ( जि. नांदेड): एका १४ वर्षीय विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची घटना लोहा तालुक्यातील माळेगाव येथे २३ जुलै रोजी घडली आहे. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्वाती त्र्यंबक वाघमारे (१४) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथील अल्पभूधारक शेतकरी त्र्यंबक वाघमारे यांना पाच मुली व एक मुलगा असे आपत्य आहेत. कोरडवाहू शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला जातो. त्यांच्या तीन मुलींचे लग्न झाले असून, दोन मुलींचे लग्न झालेले नाही. त्यापैकी स्वाती वाघमारे ही सगळ्यात लहान मुलगी, नववी वर्गात शिकणारी स्वाती अभ्यासात हुशार होती. ती घर कामातही मदत करीत होती. दर रविवारी खंडोबा मंदिरात भाविकांसाठी अन्नदान असते. स्वाती त्या दिवशी मंदिरात गेली, त्या ठिकाणी जेवण केले, तेथे भांडे धुण्यासाठी मदत करून काही अन्न तिने घरी देखील आणले. त्यानंतर ती घरातून बाहेर पडली; परंतु रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. शोध घेतला असता गावाशेजारी असलेल्या एका पळसाच्या झाडाला तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीEducationशिक्षण