शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:37 IST

''आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड): तालुक्यातील दाभड येथे ७५ वर्षीय पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी यांची निर्घृण हत्या होऊन आठवडा उलटला, तरी आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज, बुधवारी दाभड येथील शेकडो ग्रामस्थांनी अर्धापूर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनावर धडक मोर्चा काढला. "आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

नेमकी घटना काय? गेल्या बुधवारी (२८ जानेवारी) पार्वतीबाई नेहमीप्रमाणे सकाळी शेताकडे गेल्या होत्या. मात्र, त्या सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरू केला. दाभड शिवारातील एका विहिरीजवळ त्यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला. अज्ञात नराधमाने त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांची क्रूर हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

तपासावर प्रश्नचिन्ह, ग्रामस्थ आक्रमकघटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला, फॉरेन्सिक टीम पाचारण केली, मात्र आठवडा होऊनही हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. परिसरातील एका हॉटेलमधील संशयित नोकरही घटनेपासून बेपत्ता असल्याची चर्चा आहे, तरीही पोलिसांच्या हाती अद्याप ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. तपासाची चक्रे संथ गतीने फिरत असल्याचा आरोप करत आज सकाळी ११ वाजता दाभडमधील सर्व धर्मीय आणि सर्व समाजातील नागरिक एकत्र आले.

महिलांच्या सुरक्षेसाठी आक्रमक मागणी मोर्चादरम्यान तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर तब्बल ६०० ग्रामस्थांच्या सह्या आहेत. "परिसरातील महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करा आणि मारेकऱ्याला तात्काळ गजाआड करा," अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पोलिसांनी तपासाची गती वाढवण्याचे आश्वासन दिले असले, तरी आरोपीला अटक होईपर्यंत शांत बसणार नाही, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dabhadi Murder: Villagers Protest Inaction in 75-Year-Old Woman's Killing

Web Summary : Outraged villagers protested at Ardhapur Tehsil after the brutal murder of a 75-year-old woman in Dabhadi. Despite an ongoing investigation, the culprit remains at large, sparking anger and demands for immediate arrest and justice.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीagitationआंदोलन