पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात उपाधीक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:03 IST2018-01-18T16:01:24+5:302018-01-18T16:03:21+5:30
पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात उपाधीक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे न्यायालयाचे आदेश
ठळक मुद्दे2013 मध्ये पोलीस कोठडीत प्रवीण बुकतरे याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता.प्रकरणात उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नांदेड : पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकावर खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
2013 मध्ये पोलीस कोठडीत प्रवीण बुकतरे याचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणात तत्कालीन पोलीस उपाधीक्षक विजय कबाडे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चौहान, फौजदार अमूल कडू यांच्या विरोधात खून करणे,पुरावा नष्ट करणे या कलमाखाली गुन्हा नोंदविण्याचे न्यायालयाने आदेश दिले.