CoronVirus : नांदेडची नाकाबंदी कोरोनाने भेदली; पिरबुऱ्हाण भागात आढळला पहिला रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 09:09 IST2020-04-22T09:08:41+5:302020-04-22T09:09:11+5:30
शहरातील पिरबुऱ्हाण नगर येथील एका 65 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉजीटिव्ह आली.

CoronVirus : नांदेडची नाकाबंदी कोरोनाने भेदली; पिरबुऱ्हाण भागात आढळला पहिला रुग्ण
नांदेड: आजवर कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला आहे. शहरातील पिरबुऱ्हाण नगर येथील एका 65 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉजीटिव्ह आली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
शेजारील सर्व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असताना नांदेड जिल्ह्यात मात्र एकही रुग्ण सापडला नव्हता. मंगळवारी पाठवलेल्या 9 नमुन्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पास्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिली माहिती. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळीच सर्व यंत्रणेची तातडीची बैठक बोलाविण्यात आली असून पिरबुऱ्हाण नगर सील करण्याची कारवाई सुरू झाली आहे.