Coronavirus: नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी दोन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 10:04 IST2020-06-12T10:04:11+5:302020-06-12T10:04:36+5:30

चौफळा आणि उमरखेड येथील बाधीत

Coronavirus: Two more deaths of coronavirus in Nanded | Coronavirus: नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी दोन बळी

Coronavirus: नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी दोन बळी

नांदेड: शहरातील चौफाळा भागातील ५२ वर्षीय  कोरोनाबाधित महिलेसह उमरखेड येथील ७४ वर्षीय बाधित रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १३ झाली आहे.  या दोन्ही रुग्णावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यान, स्वॅब तपासणी नमुण्यांचे आणखी १२ तपासणी अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला. यातील ११ नमुणे निगेटीव्ह आढळून आले तर एक अहवाल पॉजिटिव्ह आढळला. या नव्या रुग्णामुळे जिल्हयातील एकूण बाधित रुग्णांची संख्या २२५ एवढी झाली आहे. नव्याने आढळून आलेला ५५ वर्षीय रुग्ण शहरातील लालवाडी परिसरातील बरकतपुरा येथील आहे. त्याच्यावर विष्णूपुरी येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

Web Title: Coronavirus: Two more deaths of coronavirus in Nanded