coronavirus : नांदेडमध्ये आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह; कुंभार गल्लीत आढळले बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 10:30 IST2020-05-23T10:29:29+5:302020-05-23T10:30:13+5:30

शहरातील कुंभार गल्ली भागातील दोन महिला आणि एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह 

coronavirus: three more corona positive in kunbhar lane Nanded | coronavirus : नांदेडमध्ये आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह; कुंभार गल्लीत आढळले बाधित रुग्ण

coronavirus : नांदेडमध्ये आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह; कुंभार गल्लीत आढळले बाधित रुग्ण

नांदेड- नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी सकाळी प्राप्त 88 अहवाला पैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर 85 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे नांदेडची रुग्ण संख्या आता 119 वर पोहचली आहे. 

शहरातील कुंभार गल्ली भागातील दोन महिला आणि एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या परिसरात भोतीचे वातावरण पसरले आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून 52 जणांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. तर 59 रुग्णावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आयसीएमआर चे पथक आज नांदेड मध्ये येणार असून रँडम पद्धतीने काही भागातील नागरिकांचे नमुने घेण्यात येणार आहेत.

Web Title: coronavirus: three more corona positive in kunbhar lane Nanded