CoronaVirus : धक्कादायक ! टँकरमधून तेलंगणाच्या १८ विद्यार्थ्यांचा जालना ते नांदेड जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 09:51 IST2020-04-25T09:48:32+5:302020-04-25T09:51:46+5:30
जालना येथे कृषी च्या अभ्यासक्रमाला असलेले हे विद्यार्थी गेल्या महिना भरापासून अडकून पडले आहेत

CoronaVirus : धक्कादायक ! टँकरमधून तेलंगणाच्या १८ विद्यार्थ्यांचा जालना ते नांदेड जीवघेणा प्रवास
नांदेड- जालना येथून टँकरमध्ये बसून 18 विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. भाग्यनगर पोलिसांनी संशयावरून टँकर अडवीत त्याची तपासणी केली .
जालना येथे कृषी च्या अभ्यासक्रमाला असलेले हे विद्यार्थी गेल्या महिना भरापासून अडकून पडले आहेत, शनिवारी पहाटे त जालना हुन टँकरमध्ये बसून नांदेडला आले, नांदेडमध्ये पोलिसांना संशय आल्याने त्यांना पकडले, या सर्व 18 विद्यार्थ्याना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले असून त्यात 16 मुले आणि 2 मुलींचा समावेश, टँकरच्या ड्रायव्हरलाही घेतले ताब्यात घेतले आहे.सगळे विद्यार्थी तेलंगणा राज्यातील रहिवाशी आहेत. नांदेडपर्यंत टँकरने आल्यावर पुढे पायी जाण्याचा होता त्यांचा विचार होता. भाग्यनगर पोलीसांनी सर्व विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयात रवानगी केली आहे.